मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग, यात राजकारण करु नये – राजेश टोपे

| Updated on: Aug 29, 2020 | 9:51 PM

उद्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढली, तर रुग्णांना दवाखान्यात जागा मिळणार नाही, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली.

मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग, यात राजकारण करु नये - राजेश टोपे
Follow us on

जालना : मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग आहे (Rajesh Tope Criticize BJP). मात्र, यात कोणी राजकारण करु नये, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भाजपच्या मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन टीका केली (Rajesh Tope Criticize BJP).

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे टप्प्याटप्प्याने एक-एक खुले करत आहेत, तेच योग्य आहे. उद्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढली, तर रुग्णांना दवाखान्यात जागा मिळणार नाही, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली.

फडणवीसांनी नागपूरमध्ये लक्ष घालावे – राजेश टोपे

तर, “विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरावे. बारामतीमध्ये ते फिरत आहेत. मात्र, राजकारण करु नये, जरा नागपूरमध्ये लक्ष घालावे”, असं म्हणत राजेश टोपेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

भाजपचं घंटा नाद आंदोलन

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि मंदिरं बंद करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने घोषित केलेल्या अनलॉकनुसार धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये मंदिरं उघडण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रात अजूनही धार्मिक स्थळं बंद आहेत. धार्मिक स्थळं अनलॉक प्रक्रियेत उघडी करावी, यासाठी भाजपने आज राज्यभर ‘उद्धवा उघड दार’ हे आंदोलन केले

Rajesh Tope Criticize BJP

संबंधित बातम्या :

जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस

भाजपने माणसातला देव ओळखला नाही, ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीका