Rajyasabha Election | नशीब …नाही तर पवार आले असते अन् राऊत मागे राहिले असते, छगन भुजबळांचा इशारा कुणाला?

| Updated on: Jun 11, 2022 | 3:21 PM

मविआच्या आमदारांनी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे. नाही तर ऐन निवडणुकीत हे प्रश्न उफाळून येतात, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

Rajyasabha Election | नशीब ...नाही तर पवार आले असते अन् राऊत मागे राहिले असते, छगन भुजबळांचा इशारा कुणाला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) सहाव्या जागेवर भाजपच्या उमेदरापुढे शिवसेनेला हार पत्करावी लागली. ऐनवेळी फासे पटलले आणि आघाडीसमोर भाजपचा विजय झाला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले, संजय राऊत काठावर वाचले. आमचं नशीब म्हणून असं घडलं, नाही तर उलटं झालं असतं. संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते.. आम्ही तर आमच्या लोकांना समजावून सांगितलं होतं. आता प्रत्येक पक्षानं आपापल्या आमदारांचं काय झालं हे पहावं, असा सूचक इशारा भुजबळ यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे पहिले उमेदवार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 41 मतं मिळाली. ते काठावर विजयी झाले. तर दुसरे उमेदवार संजय पवार यांचा भाजपचे धनंजय महाडिक यांच्यासमोर पराभव झाला. अत्यंत क्लीष्ट अशा राज्यसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी डावपेच टाकल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. यानंतर शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे.

संजय राऊतांवर काय म्हणाले भुजबळ?

राज्यसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, ‘ पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे असा आमचा प्रयत्न होता. मात्र संजय राऊतच निवडून येतील की नाही अशी स्थिती झाली. नशीब म्हणून संजय राऊत काठावर वाचले. नाही तर संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते. पण ऐनवेळी धोका टळला, अशी प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला.

‘मविआत नाराजी उफाळून आलीय….’

राज्यसभेत एक जागा हातची गेली. मात्र विधानपरिषद निवडणुकीत मात्र मविआनं सावध रहायला पाहिजे, यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘ सरकार असताना आम्ही 170 ऐवजी 180 ची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो आहोत. पवारांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर यावेळी उफाळून आली. मविआ चा कोणताही आमदार आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे. तिथल्या आमदाराला तो दुखावला जाणार नाही, त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजप खेळ करू पाहते आहे. भाजपाने आधी 4 नंतर 6 उमेदवार सांगितले आहेत. आमचे 6 उमेदवार निवडणून येतील असे आम्हाला पहावं लागेल

हे सुद्धा वाचा

‘एकमेकांच्या टांगेत टांग टागता कामा नये’

शरद पवार यांनी राज्यसभा निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेचा मतितार्थ लक्षात घेणं आवश्यक असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. मविआच्या आमदारांनी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे. नाही तर ऐन निवडणुकीत हे प्रश्न उफाळून येतात, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.