AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Results 2022: भाजपनं दोन राज्यात तक्रार केली, दोन्ही राज्यात बाजी मारली, महाराष्ट्रात जे शिवसेनेसोबत घडलं ते हरयाणात काँग्रेससोबत, कसं काय?

हरियाणात 31 मतांच्या कोट्यासाठी 31 आमदार काँग्रेसकडे होते. पण कुलदीप बिश्नोई नाराज होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचा ड्रामा सुरु झाला. आधी काँग्रेसचे अजय माकन जिंकल्याची घोषणा झाली. पण पुन्हा एकदा मतमोजणी झाली आणि माकन हारल्याचे समजले. निकालानंतर कळलं की, बिश्नोई यांनी क्रॉस वोटिंग केले तर बीबी बत्रा यांचं मत अवैध घोषित करण्यात आलं.

Rajya Sabha Election Results 2022: भाजपनं दोन राज्यात तक्रार केली, दोन्ही राज्यात बाजी मारली, महाराष्ट्रात जे शिवसेनेसोबत घडलं ते हरयाणात काँग्रेससोबत, कसं काय?
डावीकडे विजयी कार्तिकेय शर्मा, त्यानंतर काँग्रेसचे पराभूत उमेदवार अजय माकन
| Updated on: Jun 11, 2022 | 2:02 PM
Share

मुंबईः महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात अखेरच्या वेळी मोठा डाव टाकून भाजपने सहाव्या जागेवरील निवडणूक जिंकली. तशीच घटना हरियाणातही (Hariyana Rajyasabha Election) घडली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मताविरोधात भाजपनं आक्षेप घेतला तर हरियाणात दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. महाराष्ट्रात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad), काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि आमदार सुहास कांदे यांनी मतदान करताना नियमभंग केल्याचा आरोप करत भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात तक्रार केली. तर हरियाणात भाजपने काँग्रेसचे आमदार किरण चौधरी आणि बीबी बत्रा यांच्या मतांवर आक्षेप घेतला. या आमदारांनी अधिकृत एजंट ऐवजी इतरांना मतं दाखव्याचा आरोप भाजपने केला. या दोन्ही राज्यात शेवटचा सदस्य निवडून येण्यासाठी भाजपने मोठे डावपेच आखले आणि त्यात ते यशस्वी झाले.

हरियाणात काँग्रेसला धक्का

भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेला धक्का दिला तसा हरियाणा काँग्रेसलाही धूळ चारली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आमदार कुलदीप बिश्नोई यांच्याकडूनच हा दगा फटका झाला. हा झटका काँग्रेसला एवढा भारी पडला की, माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे प्रतिष्ठित नेता अजय माकन यांना हार पत्करावी लागली. या निवडणुकीत भाजप समर्थित अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांचा विजय झाला. मतमोजणी होतानाच भाजपने दोन आमदारांच्या मतदानाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र राज्य निवडणूक आयोगाने ही तक्रार फेटाळून लावल्यानंतर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं. भाजपसहित सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदार कार्तिकेय शर्मा यांना 27 मतं होती. त्यांना जिंकण्यासाठी 3 मतांचीच गरज होती. काँग्रेसकडे तर पूर्ण मतं होती. 31 मतांच्या कोट्यासाठी 31 आमदार काँग्रेसकडे होते. पण कुलदीप बिश्नोई नाराज होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचा ड्रामा सुरु झाला. आधी काँग्रेसचे अजय माकन जिंकल्याची घोषणा झाली. पण पुन्हा एकदा मतमोजणी झाली आणि माकन हारल्याचे समजले. निकालानंतर कळलं की, बिश्नोई यांनी क्रॉस वोटिंग केले तर बीबी बत्रा यांचं मत अवैध घोषित करण्यात आलं.

मतमोजणी लांबल्यावर अजय माकन यांनी केलेलं ट्वीट- 

महाराष्ट्रात काय घडलं?

महाराष्ट्रातही भाजपने यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला. भाजपने केद्रीय आयोगाला पत्र पाठवत आपला आक्षेप नोंदवला. मतमोजणी रखडली आणि दुसऱ्या फेरीत भाजपचे धनंजय महाडिक निवडून आले आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.