Devendra Bhuyar : शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंंद्र भुयार संजय राऊतांच्या भेटीला, राऊत समजूत काढणार?

| Updated on: Jun 12, 2022 | 7:23 PM

पवारांच्या भेटीनंतर ते थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आता संजय राऊतही देवेंद्र भुयार यांची समजूत काढत आहेत. तसेच निधीवरूनही देवेंद्र भुयारांनी आघाडी सरकारला काही संतप्त सवाल केले आहेत.

Devendra Bhuyar : शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंंद्र भुयार संजय राऊतांच्या भेटीला, राऊत समजूत काढणार?
शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंंद्र भुयार संजय राऊतांच्या भेटीला
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील (Rajyasabha Election) शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) काही अपक्ष आमदारांनी दगा दिल्याचा आरोप केला. त्यात मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांचाही समावेश होता. संजय राऊतांच्या आरोपांनंतर आता देवेंद्र भुयारही आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. पवारांनी त्यांची समजूत काढली. तसेच पवारांच्या भेटीनंतर ते थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आता संजय राऊतही देवेंद्र भुयार यांची समजूत काढत आहेत. तसेच निधीवरूनही देवेंद्र भुयारांनी आघाडी सरकारला काही संतप्त सवाल केले आहेत. या पराभवानंतर विधान परिषदेसाठीही आता महाविकास आघाडीच्या गोटातील हलचाली वाढल्या आहेत. तर विधान परिषेदतही हाच किस्सा रिपीट होतो की महाविकास आघाडी भाजपला रोखण्यात यशस्वी होणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राऊतांच्या भेटीनंतर भुयार यांची पहिली प्रतिक्रिया

या भेटीनंतर पहिली प्रतिक्रिया देताना देवेंद्र भुयार म्हणाले, राऊतांचा गैरसमज मी दूर केल आहे. विधान परिषदेतही मी महाविकास आघाडीसाठी काम करणार आहे. . राज्यसभा निवडणुकीत नियोजन कमी पडल्याने पराभव झाला आहे. आता पुढी हीच खबरदारी घ्यावी, अन्यथा पुढेही असेच होऊ शकते. तसेच त्यांनी कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करावी, आम्ही दगा दिला नाही. मात्र जाणीवपूर्वक आमचं नावं घेऊ नये अशी विनंती राऊतांना केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी बराच काळ भेट दिली नाही हे खरं आहे मात्र आता ते आजारपणातून बरे झाल्यावर भेटील होतील, असे भुयार म्हणाले.

शरद पवार यांचीही घेतली भेट

तसेच भुयार यांनी राऊतांची भेट घेण्याआधी पवारांची भेट घेतली आहे.  शिवसेनेकडून पराभवाचं खापर माझ्यावर फोडलं आहे. यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली आहे. याविषयावर खुलासा करण्याची माझी मागणी आहे. आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रसंग आहे. हे कुठेतरी थांबलंं पाहिजे. लोकांच्या नजरेत आम्हाला खाली पाडण्याचाही हा प्रयत्न आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तसेच राऊतांच्या गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असे पवारांनी सांगितलं,  मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसोबत आहे. माझ्यावर शंका घ्यायचा प्रकार व्हायला नको होता. असे होत असेल तर  विधान परिषदेची निडणूक आहे, राष्ट्रपतीपदासाचीही निवडणूक आहे, त्यावेळी मला विचार करावा लागेल, असा इशाराही ते महाविकास आघाडीला देताना दिसून आले.