Rajyasabha Election : शिवसेनेचं शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला, राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा लवकरच सुटणार

| Updated on: May 22, 2022 | 3:45 PM

शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची संभाजीराजे यांच्यासोबत बैठक सुरू आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा सस्पेन्स सध्या वाढला आहे. मात्र या भेटीनंतर हा सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे.

Rajyasabha Election : शिवसेनेचं शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला, राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा लवकरच सुटणार
शिवसेनेचं शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीला, राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा लवकरच सुटणार
Follow us on

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) यांना भेटण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ (Shivsena) ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झालंय. शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची संभाजीराजे यांच्यासोबत बैठक सुरू आहे. राज्यसभेच्या सहाव्या (Rajyasabha Election) जागेचा सस्पेन्स सध्या वाढला आहे. मात्र या भेटीनंतर हा सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती. मात्र या भेटीनंतरही काही तोडगा निघाला नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला संभाजीराजेंना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर शनिवारी जी शिवसेनेची भूमिका असेल तीच राष्ट्रवादीची राहील असे सांगितले होते, त्यामुळे या जागेचा संभ्रम आणखी वाढला होता.

सहाव्या जागेचा तिढा आजच सुटणार?

राज्यातून राज्यसभेवर सहा जागा निवडून दिल्या जाणार आहेत. त्यात दोन जागा भाजपच्या असणार आहेत. तर एक जागा राष्ट्रवादी, एक जागा शिवसेना आणि एक जागा काँग्रेसची असणार आहे. तर एका जागेसाठी कुणाकडेच बहुमत नाही. त्यामुळे या जागेवरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची हाक दिल्यानंतर या जागेचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. इतर पक्षांकडून पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा संभाजीराजे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र भाजप आणि शिवेसनेने त्यांना काही अटी घातल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिली आहे. त्यात शिवसेनेकडून लढावं ही अट शिवसेनेने घातली आहे. तर अपक्षच लढावं अशी अट पाठिंब्यासाठी भाजपकडून घालण्यात आली आहे.

शिवसेना पुरस्कृत लढण्याच्या चर्चा राऊतांनी फेटाळल्या

काही तासांपूर्वीच संभाजीराजे हे शिवसेने पुरस्कृत उमेदावर म्हणून ही निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र काही वेळापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगून संभाजी छत्रपती यांचं टेन्शन वाढवलं आहे. तसेच राऊत एवढेच बोलून थांबले नाहीत तर  शिवसेना पुरस्कृत असा निर्णय झाला नाही. आम्ही दुसरा उमेदवार देऊ. तो शिवसेनेचाच असेल. ही शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका आहे, असेही राऊतांनी यावेळी सांगून टाकलं आहे. त्यामुळे राजकीय गोटातील हलचालींचा आत्ताच अंदाज बांधणे कठीण आहे.

हे सुद्धा वाचा