AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Marriage: 70 वर्षांचा नवरा, 22 वर्षांची सुंदर नवरी, गोष्ट हटके लग्नाची, मधुचंद्र कुठं साजरा करणार? चर्चांना सोशल मीडियावर उधाण

Pakistan Marriage: पाकिस्तानातील 70 वर्षांचे हकीम बाबर यांचा उत्साह तरुणालाही लाजवणारा आहे. कारण अनेक तरूण अविवाहित असताना ते पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर चढले आहेत. त्यांची पत्नी अवघ्या 22 वर्षांची तरुणी आहे. त्यांच्या मधुचंद्राची जोरदार चर्चा सुरू आहे.

Pakistan Marriage: 70 वर्षांचा नवरा, 22 वर्षांची सुंदर नवरी, गोष्ट हटके लग्नाची, मधुचंद्र कुठं साजरा करणार? चर्चांना सोशल मीडियावर उधाण
पाकिस्तान हटके लग्नImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 25, 2026 | 1:04 PM
Share

Pakistan Marriage Hakim Babar: पाकिस्तानमध्ये सध्या एक हटके लग्न खूप चर्चेत आले आहे. त्याची सोशल मीडियावर धूम सुरू आहे. 70 वर्षांचे हकीम बाबर हे पुन्हा एकदा बोहल्यावर चढले आहेत. त्यांची पत्नी अवघ्या 22 वर्षांची आहे. एकीकडे मुली मिळत नसल्याने अविवाहित तरुणांची मोठी फौज तयार होत असताना बाबर यांनी मात्र या वयातही नशीब काढल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अर्थात उलटसुलट चर्चांना या नवरीने उत्तर दिले आहे. आपल्यावर लग्नासाठी कुणाचाही दबाव नसल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान हे जोडपे मधुचंद्रासाठी कुठं जाणार असा सवाल त्यांना समाज माध्यमातून विचारण्यात आल्यावर बाबर यांनी त्याला उत्तर दिले आहे.

पाकिस्तानी वृत्तसंस्था Tribune नुसार, पत्रकार जेव्हा बाबर यांच्या घर पोहचले, तेव्हा त्यांनी आणि पत्नीने वय हा केवळ आकडा असल्याचा दावा केला. निकाह, दोघांचा खासगी विषय आहे. वयाच्या अंतराचा कोणताही विषय दोघांमध्ये नाही. वयाचा मुद्दा समोर आणणे योग्य नाही. हकीम बाबर याने सांगितले की दोघांचे लग्न हा प्रेमविवाह आहे. दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे.

मन तरुण हवे -बाबर

70 व्या वर्षी लग्न करण्यावरून बाबर यांच्यावर टीका होत आहे. त्यावेळी मनुष्याचे मन तरूण हवे, बाकी सगळ्या वायफळ चर्चा असल्याचे बाबर म्हणाले. त्यांची पत्नी ही घटस्फोटीत आहे आणि तिने हा निकाह योग्य आणि वैध असल्याचा दावा केला आहे. बाबर यांच्या मते लपून संबंध ठेवण्यापेक्षा त्यांनी उघडपणे लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यात चुकले काय, त्यांनी समाजाच्या दुटप्पीपणावर निशाणा साधला आहे. दोष देण्यापेक्षा आमच्या दोघांच्या निर्णयाचा सन्मान करावा असे मत त्यांनी मांडले.

नेदरलँडमध्ये हनीमूनसाठी जाणार

पत्नीने बाबर यांचे समर्थन केले आहे. दोघांचे एकमेकांवर खरं प्रेम आहे. त्यामुळे वयाचा मुद्दा गौण असल्याचे ती म्हणाली. जर तुमची काळजी करणारी व्यक्ती असेल तर मग लग्न करण्यास उशीर करू नये. मी तेच केले. समाज माध्यमावर आम्हाला काय ट्रोल करण्यात येत आहे याच्याशी मला काही देणे घेणे नसल्याचे ती म्हणाली. ईदनंतर हे जोडपे उमराहसाठी सौदी अरबला जाणार आहे. त्यानंतर हनीमूनसाठी दोघे नेदरलँडमध्ये जाणार असल्याचे समजते.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...