AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरंगी रंगात न्हाहली संसद, पीएम मोदींच्या कौतुकांनी भरले वर्तमानपत्रांचे रकाने, पंतप्रधानांचा इस्त्रायल दौर्‍याची मोठी उत्सुकता

PM Narendra Modi on Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते इस्त्रायल संसदेला संबोधित करतील. त्यांच्या स्वागतासाठी इस्त्रायल संसद तिरंगी रंगात न्हाऊन निघाली आहे. या दौऱ्यात विविध विषयावर आणि मुद्दावर, व्यापार आणि संरक्षणावर चर्चा होऊन काही करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तिरंगी रंगात न्हाहली संसद, पीएम मोदींच्या कौतुकांनी भरले वर्तमानपत्रांचे रकाने, पंतप्रधानांचा इस्त्रायल दौर्‍याची मोठी उत्सुकता
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दौऱ्यावरImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Feb 25, 2026 | 12:15 PM
Share

PM Narendra Modi on Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इस्त्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी इस्त्रायलमध्ये मोठी तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत असल्याचे जाहीर करत इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी मोदी आणि भारत मित्र असल्याचे म्हटले आहे. पीएम मोदी हे दोन दिवसांमध्ये संरक्षण आणि राजकीय संबंधांवर चर्चा करतील. या दौर्‍याच्या पहिल्या दिवशी बुधवारी मोदी एका खासगी मेजवाणी आयोजित करण्यात आली आहे. या वेळी मोदी हे पंतप्रधान नेतन्याहू यांना भेटतील. इस्त्रायलची संसद नेसेटला संबोधित करतील.

नेसेट तिरंगी रंगात न्हाहली

नरेंद्र मोदी यांच्या इस्त्रायल दोल्यापूर्वीच इस्त्रायलची संसद नेसेट भारतीय झेंड्याच्या रंगात न्हाहली. संसदेवर तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. नेसेटचे अध्यक्ष आमिर ओहाना यांनी सोशल मीडिया एक्सवर याविषयीची माहिती दिली. तर पंतप्रधान संसदेला संबोधित करणार असल्याने वाद सुरू झाला आहे. इस्त्रायल माध्यमांमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. जेरुसलम पोस्टने हिंदीत नमस्ते मोदी असे शीर्षक छापले आहे. अनेक वृत्तपत्रांनी पीएम मोदी यांच्या या दौर्‍याविषयी तोंडभरून कौतुक केले आहे.

विरोधी पक्षाचा वेगळा सूर

येश अतीद पक्षाचे याइर लॅपिड यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाने स्पष्ट केले आहे की ते मोदींच्या भाषणासाठी नॅसेटमध्ये हजर राहणार नाहीत. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आयजॅक अमित यांना बोलवण्याची मागणी करण्यात आली आहे. परदेशी नेत्याच्या सन्मानासाठी संसदेचे खास सत्र आयोजित करणे ही सर्वसामान्य बाब आहे. पण नॅसेटच्या अध्यक्षांनी अमित यांना बोलवणे धाडले पाहिजे अशी भूमिका लॅपिड यांनी घेतली. त्यांनी नेतन्याहू यांच्याकडे याविषयीची मागणी केली. त्यामुळे सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सच्चे मित्र

विरोधी पक्ष नेते याइर लॅपिड यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे, त्यानुसार, सर्व इस्त्रायल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. ते इस्त्रायलचे सच्चे मित्र आहेत. इस्त्रायल आणि भारत यांच्यातील संबंध केवळ राजकीय नाहीत तर दोन्ही देशात घनिष्ठ मित्रता असल्याचे लॅपिड यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान दोन दिवसीय इस्त्रायल दौऱ्यावर

मोदी यांनी 2017 मध्ये इस्त्रायलचा पहिल्यांदा दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ झाली. दोन्ही देशातील व्यापार सातत्याने वाढत आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. इस्त्रायलकडून अनेक नव्या दमाची शस्त्रास्त्रे भारताला देण्यात आली आहे. तर आता सायबर सुरक्षा, कृषी तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थापन याक्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये मोठी भागीदारी होणार असल्याचे समोर येत आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ