Shopping : मुंबईचा कोलाबा कॉजवे मार्केट महिलांसाठी बेस्ट, येथून खरेदी करा ‘या’ 5 वस्तू
Shopping : शॉपिंगसाठी मुंबई बेस्ट आहे, कारण येथे महिलांसाठी ट्रेंडी कपडे मिळतात. पण मुंबईतील कोलाबा कॉजवे असं मार्केट आहे. जेथे महिलांची कायम गर्दी असते... विशेषतः 'या' वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची कायम या मार्केटमध्ये गर्दी असते... तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या 5 वस्तू

Shopping : नवरात्री संपल्यानंतर आता दिवाळीची जवळ आली आाहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे शॉपिगची आजपासूनच सुरुवात झाली असेल. पण अनेक महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवाळीत कोणत्या स्टाईलचे कपडे घालायचं. काही महिला मॉर्डन कपडे घालायला प्रचंड आवडतात त्यांच्यासाठी मुंबईतील कोलाबा कॉजवे उत्तम पर्याय आहे. मुंबईच्या दक्षिण भागात स्थित असलेला कुलाबा कॉजवे मार्केट एक प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट आहे. येथे तुम्हाला कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत आणि कला व हस्तकलेपासून ते शोभेच्या वस्तूपर्यंत सर्व काही मिळेल. जर तुम्ही मुंबईत फिरायला जात असाल, तर एकदा कुलाबा कॉजवेला नक्की भेट द्या. येथील खरेदीचा अनुभव अत्यंत खास असतो.
कुलाबा कॉजवे मार्केटमध्ये मिळणाऱ्या 5 वस्तू..
कपडे : कुलाबा कॉजवेमध्ये भारतीय आणि विदेशी, असे दोन्ही प्रकारचे कपडे मिळतात. येथील दुकानांवर पारंपरिक भारतीय कपडे, जसं की कुर्ता-पायजमा, साडी आणि लेहेंगा इत्यादी खूप आकर्षक असतात. याशिवाय, येथे वेस्टर्न आऊटफिच जसं की टी-शर्ट, जीन्स आणि ड्रेसेस देखील मिळतात. येथील कपड्यांच्या किंमतीही फार कमी असतात, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय खरेदी करू शकता. येथे नेहमी नवीन ट्रेण्डचे कपडे सहज मिळतात.
दागिने : कुलाबा कॉजवेमध्ये नकाली दागिन्यांचे अनेक प्रकार मिळतात, जे अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. हे दागिने पार्टी किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी उत्तम असतात. येथे सोन्याचे, चांदीचे किंवा हिऱ्याचे दागिने मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या किंमती खूप कमी असतात आणि तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता. हा मार्केट विशेषतः कडे, बेल्ट, चष्मा, अंगठ्या, हार आणि निरनिराळ्या प्रकारच्या कानातल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
शोभेच्या वस्तू : जर तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी काही शोभेच्या वस्तू शोधत असाल, तर कुलाबा कॉजवे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे लाकडापासून बनवलेल्या फर्निचरपासून ते मातीच्या भांड्यांपर्यंत सर्वकाही मिळेल. याशिवाय, येथे भारतीय कला आणि हस्तकलेपासून बनवलेल्या वस्तूही उपलब्ध आहेत, ज्या तुमच्या घराची शोभा वाढवू शकतात. येथील शोभेच्या वस्तूंच्या किंमतीही खूप कमी असतात आणि तुम्ही बार्गेनिंग करून दर कमी करून शकता.
कला आणि हस्तकला : कुलाबा कॉजवे हे कलाप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे स्थानिक कलाकारांनी बनवलेली चित्रे, पुतळे आणि इतर कलाकृती मिळतात. या वस्तू केवळ पाहण्यात सुंदर वाटत नाहीत, तर त्यामध्ये स्थानिक संस्कृतीची झलकही पाहायला मिळते. तुम्ही या वस्तू तुमच्या घराच्या सजावटीसाठी किंवा कोणाला भेट देण्यासाठी खरेदी करू शकता. येथील कलाकृतींच्या किंमतीही खूप कमी असतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता.
पुस्तके : कुलाबा कॉजवेमध्ये एक लहानसे बुकस्टोरही आहे, जिथे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांची पुस्तके मिळतात. येथे तुम्हाला कादंबऱ्या, आत्मचरित्रे आणि कवितासंग्रह इत्यादी मिळतील. जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. येथे पुस्तके खरेदी करणं देखील स्वस्त पडतं, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये राहून चांगली पुस्तके खरेदी करू शकता. या बाजारात तुम्हाला अनेक सुंदर फ्रिज मॅग्नेट देखील मिळतील, जे घराची सजावट करतील. त्यामुळे या मार्केटला एक भेट नक्की द्या…
