AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 हजाराची लाच घेताना पकडलं, सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली तर नुसती नोटांची बंडलं, इतक्या कोटीचं घबाड हाताला लागलं

देबब्रत मोहंती यांच्या अटकेनंतर विजिलेंस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. यात पाटियाच्या श्री विहार येथे नेचर्स क्रेस्ट अपार्टमेंटमध्ये त्यांचा रेजिडेंशियल फ्लॅट आहे.

30 हजाराची लाच घेताना पकडलं, सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली तर नुसती नोटांची बंडलं, इतक्या कोटीचं घबाड हाताला लागलं
Cash Found in Raid
| Updated on: Feb 25, 2026 | 12:47 PM
Share

एका लायसन्स असलेल्या कोळसा वेंडरकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना एका सरकारी अधिकाऱ्याला पकडलं. त्यानंतर त्याच्या घरावर धाड टाकली, तेव्हा मोठं घबाड हाती लागलं. सरकारी अधिकाऱ्यांच्या घरात कोट्यवधी रुपये सापडल्याची अशी अनेक प्रकरणं आहेत. कटक सर्कल माइन्सचे डेप्युटी डायरेक्टर देबब्रत मोहंती यांना एका दिवसापूर्वी ट्रॅप ऑपरेशनमध्ये पकडलं होतं. त्यात ते लायसन्स असलेल्या कोळसा वेंडरकडून 30 हजार रुपयांची लाच घेत होते. त्यानंतर ओदिशाच्या भुवनेश्वरमधील अँटी करप्शन एजन्सीने बुधवारी देबब्रत मोहंती यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथून 4 कोटी रुपये जप्त केले. ओदिशा विजिलन्सच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कॅश जप्तीची कारवाई आहे.

देबब्रत मोहंती यांच्या अटकेनंतर विजिलेंस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. यात पाटियाच्या श्री विहार येथे नेचर्स क्रेस्ट अपार्टमेंटमध्ये त्यांचा रेजिडेंशियल फ्लॅट आहे. भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथे वडिलोपार्जित घर आणि कटकमधल्या त्यांच्या ऑफिस चेम्बर येथे छापेमारीची कारवाई करण्यात आली.

पैशांची मोजणी सुरु आहे

छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांच्या भुवनेश्वरच्या फ्लॅटमधील ट्रॉली बॅग आणि कपाटात मोठ्या प्रमाणात असलेली रोख रक्कम, कॅश जप्त केली. एकूण किती रक्कम जप्त केली ते समजावं, यासाठी जप्त केलेल्या पैशांची मोजणी सुरु आहे. त्याशिवाय आरोपीच्या ऑफिसचं शेल्फ आणि त्याच्या खासगी सामानातून 1.20 लाख रुपये जप्त केले.

सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे

विजिलेंस टीमला दुसऱ्या संपत्तीची सुद्धा माहिती मिळाली आहे. यात भुवनेश्वरच्या पहला येथे 2400 चौरस फुटाची एक दोन मजली इमारत आणि जवळपास 130 ग्रॅम सोनं याचा समावेश आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे. तपास पुढे केल्यानंतर अजून माहिती दिली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्याकडे अजून ब्लॅक मनी आणि बेकायद सामना मिळू शकतं असा अंदाज आहे.

एफआयआर करण्यापासून आम्हाला का थांबवलं? रोहित पवारांचा सवाल
एफआयआर करण्यापासून आम्हाला का थांबवलं? रोहित पवारांचा सवाल.
रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल; काय घडलं?
रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल; काय घडलं?.
कांद्याचे भाव घसरले! आक्रमक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले
कांद्याचे भाव घसरले! आक्रमक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार.
नायडूंना पदावर राहण्याचा अधिकार नाही! रोहित पवारांची टीका
नायडूंना पदावर राहण्याचा अधिकार नाही! रोहित पवारांची टीका.
दादर स्टेशनवरील 'चालता-फिरता इंडिकेटर'! प्रवाशांसाठी निस्वार्थ सेवा
दादर स्टेशनवरील 'चालता-फिरता इंडिकेटर'! प्रवाशांसाठी निस्वार्थ सेवा.
सोलापुरात अवकाळीचा फटका: टोमॅटो, ज्वारी, गहूसह अनेक पिके उद्ध्वस्त
सोलापुरात अवकाळीचा फटका: टोमॅटो, ज्वारी, गहूसह अनेक पिके उद्ध्वस्त.
अकोलेतून लाल वादळ अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होणार!
अकोलेतून लाल वादळ अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होणार!.
जय पवारांकडून अजितदादांच्या जुन्या फोटोंचा 'तो' व्हिडीओ पोस्ट
जय पवारांकडून अजितदादांच्या जुन्या फोटोंचा 'तो' व्हिडीओ पोस्ट.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे बारामतीची धुरा! पोटनिवडणूक लढवणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे बारामतीची धुरा! पोटनिवडणूक लढवणार.