उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे बारामतीची धुरा! पोटनिवडणूक लढवणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर एकमत झाले असून, पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर आहे. संविधानानुसार पद टिकवण्यासाठी त्यांना सहा महिन्यांत विधिमंडळाचे सदस्यत्व घेणे अनिवार्य आहे. पार्थ पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरही याच बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या निर्णयावर एकमत झाले आहे. पक्षाचा या पोटनिवडणुकीला बिनविरोध करण्यावर भर असेल. बारामती विधानसभेची प्रारुप मतदार यादी 10 मार्च रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
संविधानानुसार, विधिमंडळाचे सदस्य नसतानाही कोणतीही व्यक्ती मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त होऊ शकते. मात्र, हे पद टिकवण्यासाठी त्यांना शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य आहे. अजित पवारांची बारामतीची धुरा आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. याआधी, सोमवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीतच हा निर्णय प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी घेण्यात आला. लवकरच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून, सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 25, 2026 11:50 AM
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
