“भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला, म्हणून त्यांचे विचारही सडलेले”, रामदास कदमची बरसले

आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला आता रामदास कदम यांनी उत्तर दिलंय.

भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला, म्हणून त्यांचे विचारही सडलेले, रामदास कदमची बरसले
| Updated on: Sep 20, 2022 | 11:18 AM

मनोज लेले, रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलेल्या टीकेला रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उत्तर दिलंय. “भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला आहे. म्हणून त्यांचे विचारही सडलेले आहेत”, असं ते म्हणालेत. गद्दार जाधवांना उद्धव ठाकरे यांनी नेता केलं. उद्धवजींची निष्ठेची भाषा काय आहे आम्हाला माहिती आहे. उद्धवजींना खुश करण्यासाठी मी रामदास कदम यांच्यावर टीका करू शकतो, हे दाखवण्याचा भास्कर जाधवांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत. रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांची तुलना भुंकणाऱ्या कुत्र्याशी केलीय.