AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात कुठेही लपू द्या साप, फक्त 5 रुपये खर्च; पळत घराबाहेर निघणार, पुन्हा आयुष्यात कधीच दिसणार नाहीत

अनेकदा साप घरात घुसण्याच्या देखील घटना घडतात. हे साप अशा जागी लपून बसतात, जिथे सहजासहजी आपली नजर जात नाही, अनेकदा असे साप दिवसा लपून बसतात, आणि रात्री शिकारीच्या शोधात बाहेर पडतात.

घरात कुठेही लपू द्या साप, फक्त 5 रुपये खर्च; पळत घराबाहेर निघणार, पुन्हा आयुष्यात कधीच दिसणार नाहीत
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 8:57 PM
Share

आपलं घर जर थोडं आऊट साईटला असेल किंवा एखाद्या जंगल परिसरात, अडचणीच्या ठिकाणी असेल तर अशावेळी अनेकदा घरात साप घुसण्याच्या घटना देखील घडतात. विशेष: फार्म हाऊसमध्ये अशा घटना प्रमुख्याने घडतात. भारतामध्ये सापांच्या अशा काही जाती आढळून येतात, ज्या दिवसभर अशा ठिकाणी लपून बसतात, जिथे सहजासहजी कोणाचीही नजर जाणार नाही, आणि रात्रीच्या वेळी त्या शिकारीच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे अशा सापांपासून काळजी घेणं गरजेचं असतं. साप घरात येऊ नये, म्हणून आजू बाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं हा एक सर्वात प्रभावी उपाय आहे, परंतु तुम्ही इतरही काही उपायांच्या मदतीने सापांपासून आपल्या घराचं संरक्षण करू शकतात. यासाठी फार खर्च देखील येत नाही.

काही विशिष्ट प्रकारच्या उग्र वासाचा सापांना प्रचंड त्रास होतो, त्यामुळे ते अशा ठिकाणी येत देखील नाहीत, अथवा त्या परिसरात कुठेही लपून बसले असतील तर ते तिथून दूर निघून जातात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे कांदा, लसून आणि आले यांचं मिश्रण असलेली पेस्ट, जर तुम्ही या मिश्रणाची पातळ पेस्ट केली आणि संपूर्ण घरात अडचणीच्या ठिकाणी फवारली तर समजा तुमच्या घरात एखादा साप लपलेला असेल तर तो ती जागा सोडून दूर निघून जाईल.  कारण सापांना याच्या उग्र वासाचा त्रास होतो. त्यासाठी फार खर्च करण्याची देखील गरज नाही.

विशेष: मण्यार सारखे जे साप असतात, ते दिवसा लपून बसतात, आणि रात्रीच्या वेळी आपल्या शिकारीसाठी बाहेर पडतात. मण्यार हा अत्यंत विषारी साप असतो. त्यामुळे अशा सापांना आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी हा उपाय उपयोगाचा ठरवू शकतो. मण्यार प्रमाणेच इतरही प्रजातीचे साप घरात घुसण्याची शक्यता असते, अशावेळी जिथून जिथून हे साप तुमच्या घरात येऊ शकतात, अशी शक्यता आहे, तिथे तिथे ही पेस्ट फवारावी, ज्यामुळे साप घरात येणार नाहीत. आणि समजा तुम्हाला कुठे तुमच्या घरात साप दिसलाच तर त्याला न मारता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, ते त्याला पकडून सुरक्षित जागी सोडतील.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान