AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lieutenant Tahsif Souri Case : नदीवर तरंगत होता बांग्लादेशच्या माजी एअरफोर्स ऑफिसरचा मृतदेह, भारताच्या RAW शी काय कनेक्शन? रहस्य गडद झालं

lieutenant Tahsif Souri Case : दोन दिवसांपूर्वी बांग्लादेशच्या एका नदीत त्यांच्याच देशाच्या माजी एअरफोर्स अधिकाऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळला. या मृत्यूच रहस्य अधिकाधिक गडद होत चाललं आहे. आता या प्रकरणात 'रॉ'चं नाव घेतलं जातय. हा अधिकारी कोण होता? काय आहे हे रहस्य?

lieutenant Tahsif Souri Case : नदीवर तरंगत होता बांग्लादेशच्या माजी एअरफोर्स ऑफिसरचा मृतदेह, भारताच्या RAW शी काय कनेक्शन? रहस्य गडद झालं
lieutenant Tahsif Souri Case
| Updated on: Oct 30, 2026 | 8:51 PM
Share

बांग्लादेश एअरफोर्सचे अधिकारी केएम तहसीफ सौरी यांच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललं आहे. माजी लेफ्टिनेंट केएम तहसीफ सौरी यांचा मृतदेह ढाक्यामध्ये एका नदीत आढळला होता. 5 ऑगस्ट 2024 रोजी बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. त्यावेळी तो व्हिडिओ रेकॉर्ड करुन शेअर करणारे केएम तहसीफचं होते. त्यानंतर सौरी यांना नोकरीवरुन बर्खास्त केलं असं बोललं जातं. बांग्लादेशचं राजकारण, कूटनिती आणि सोशल मीडियावर ते RAW चे एजंट असल्याची चर्चा होती. ‘रॉ’ ही भारताची गुप्तचर यंत्रणा आहे. देशाबाहेरील सुरक्षेची जबाबदारी रॉ वर आहे. ढाका येथे एक नदीत सौरी यांचा मृतदेह आढळला. आपल्या मृत्यूच्या काही महिने आधी सौरीने एका पॉडकास्टमध्ये या मुद्यांवर भाष्य केले होते. 2025 साली एका शाळेजवळ झालेल्या फायटर जेट क्रॅश प्रकरणातही कारवाईवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेलं. या क्रॅशमध्ये 35 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला.

जुलै महिन्यात एका सोशल मिडिया पॉडकास्टमध्ये सौरी यांना विचारण्यात आलेलं की, हसीना देश सोडून जातानाचा व्हिडिओ तुम्ही बनवला,म्हणून तुमची नोकरी गेली का?. त्यावर थोडक्यात बोलताना त्यांनी ‘कदाचिते हे खरं असेल’ असं उत्तर दिलेलं. बांग्लादेश एअरफोर्सच्या या माजी अधिकाऱ्याचा मृतदेह 28 ऑक्टोंबरला ढाक्याच्या तुराग नदीत तरंगताना दिसलेला. 24 तासापेक्षा अधिक वेळ सौरी बेपत्ता होते. 27 ऑक्टोंबरला सौरी आपली मोटरसायकल दुरुस्त करण्यासाठी मित्रासोबत घरातून निघाले होते. पण पुन्हा कधी परतले नाहीत.

त्या रिपोर्टमध्ये सौरीचं सुद्धा नाव होतं

‘ढाका ट्रिब्यून’च्या एका रिपोर्टनुसार, सौरीचे वडिल आणि चुलत भावाने त्याची हत्या झाल्याचा आरोप केला. पोलीस या विषयावर काहीही बोलणं टाळत आहेत. सौरी यांचा वादग्रस्त भूतकाळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सौरी यांनी बनवलेल्या कथित व्हिडिओची एअरफोर्सने चौकशी केली. त्यावेळी विभागाचे काही अधिकारी आणि भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ यांच्यातील संबंध समोर आले होते. त्या रिपोर्टमध्ये सौरीचं सुद्धा नाव होतं. त्यानंतर सरकारने त्यांचा पासपोर्ट जप्त केलं.

कसली चिंता आहे हे त्याने कधी सांगितलं नाही

सौरीचे वडिल इनायतुल करीम हेलाल ‘जागो न्यूज’ शी बोलताना म्हणाले की, “पॉडकास्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांचा मुलगा कधी-कधी सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करायचा. कधी-कधी तो मला सांगायचा की, मला भिती वाटते. पण त्याला कसली चिंता आहे हे त्याने कधी सांगितलं नाही”

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान