Ramdas Kadam | मीच राजीनामा दिलाय, हकालपट्टीचा प्रश्न येतोच कुठे? किती लोकांची हकालपट्टी करणार आहात? रामदास कदमांचा थेट सवाल

| Updated on: Jul 19, 2022 | 1:34 PM

शिवसेनाप्रमुखांचा चिरंजीव राष्ट्रवादीसोबत बसून मुख्यमंत्री होतो हे कळल्यावर मी त्यांना हात जोडले. म्हटलं उद्धव जी, हे पाप करू नका. हे साहेबांना आवडणार नाही, असे माझे शब्द होते, असं रामदास कदम म्हणाले.

Ramdas Kadam | मीच राजीनामा दिलाय, हकालपट्टीचा प्रश्न येतोच कुठे? किती लोकांची हकालपट्टी करणार आहात? रामदास कदमांचा थेट सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र पाठवले. मात्र तुमच्या हकालपट्टीचा प्रश्न येतोच कुठेय, मीच राजीनामा दिलाय. तुम्ही आणखी किती लोकांची हकालपट्टी करणार, असा थेट सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. पक्षात 52 वर्षे काम करणारा नेता राजीनामा देतोय, कमीत कमी त्याला एक फोन तरी करायला पाहिजे, अशी खदखद रामदास कदम यांनी बोलून दाखवली. रत्नागिरीतील शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज प्रसार माध्यमांसमोर आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सलगी करणाऱ्या उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांची हकालपट्टी करण्याआधी आत्मचिंतन करायला पाहिजे. एवढ्या लोकांना पक्षातून का काढून टाकावं लागतंय, याचा विचार केला पाहिजे, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं.

‘मीच राजीनामा दिलाय…’

शिवसेनाप्रमुखांनी हकालपट्टी करण्यापूर्वी मीच राजीनामा दिलाय, असे सांगताना रामदास कदम म्हणाले, ‘ मीच राजीनामा समोरून दिलाय. तर हकालपट्टींचा प्रश्न येतोच कुठे. तुम्ही किती लोकांची हकालपट्टी करणार आहात. उलट पक्षी उद्धवजींनी 52 वर्ष काम करणारा नेता राजीनामा देतोय. कमीत कमी एक फोन तरी करायला पाहिजे. या रामदास भाई काय झालं, बोलू आपण. काहीच नाही. थेट हकालपट्टी. काही झालं तरी हकालपट्टी. आनंदराव अडसूळ हकालपट्टी, शिवाजीराव पाटील हकालपट्टी, रामदास कदम हकालपट्टी, एकनाथ शिंदे हकालपट्टी, आमदार हकालपट्टी, नगरसेवक जात आहेत हकालपट्टी, एवढंच काम आहे का. हकालपट्टीची वेळ का येते याचं आत्मपरीक्षण करणार की नाही. त्याचा अभ्यास कोण करणार. ही वेळ कुणामुळे येते. आजबाजूला कोण आहे, याचा विचार करा, असा सल्ला रामदाक कदम यांनी दिला.

राष्ट्रवादीसोबत हे पाप करू नका म्हटलं होतं…

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीसोबत जाणं चुकीचं होतं हे सांगताना रामदास कदम म्हणाले, ‘ बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना मराठी माणसाची शिवसेना या घोषवाक्यांने सुरुवात केली. त्यांनी हिंदुत्वासाठी अख्ख आयुष्य घालवलं. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आयुष्यभर संघर्ष केला. त्या शिवसेनाप्रमुखांचा चिरंजीव राष्ट्रवादीसोबत बसून मुख्यमंत्री होतो हे कळल्यावर मी त्यांना हात जोडले. म्हटलं उद्धव जी, हे पाप करू नका. हे साहेबांना आवडणार नाही. आपल्या पक्षाची ताकद वाढवू. व्हा तुम्ही मुख्यमंत्री. आपले आमदार निवडून आणू. पण साहेबांचं असं स्वप्न नव्हतं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष केला. त्यांना घेऊन मुख्यमंत्री व्हा असं स्वप्न साहेबांचं नव्हतं. साहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं.

‘शरद पवारांवर एवढं प्रेम का?’

उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवर एवढं प्रेम का आहे, हेच कळत नसल्याचं रामदास कदम म्हणाले. यावर बोलताना ते म्हणाले, ‘ उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवर एवढं प्रेम का हेच तर मला कळत नाही. कोडं उलगडत नाही. रात्री दोन दोन वाजता उठून बसतोय. जेवण जात नाही. तेच माझंही दुख आहे. आपला पक्ष फुटतोय. आपल्या पक्षात उभी फूट पडतेय. तरी मी शरद पवारांना सोडत नाही. पक्ष संपला तरी चालेल. हे का होतंय..