Video : खोतकर आणि माझ्यातील मतभेद मिटले, एकमेकांना साखर भरवली आता आम्ही एकत्र काम करणार- रावसाहेब दानवे

जालना मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ तो आमच्याकडेच राहील- दानवे

Video : खोतकर आणि माझ्यातील मतभेद मिटले, एकमेकांना साखर भरवली आता आम्ही एकत्र काम करणार- रावसाहेब दानवे
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 12:42 PM

नवी दिल्ली: शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि केंद्रीय मंत्री, भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय वैर सगळेच जाणतात. पण आता मराठवाड्यातील या दोन नेत्यांचं मनोमिलन झालं आहे. तशी माहिती खुद्द रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी दिली आहे. “खोतकर आणि आमच्यातले वाद आता मिटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आम्ही दोघांनी एकमेकांना साखर भरवली”, असं दानवे म्हणाले. शिवाय “आता शिवसेना आम्ही भाजप एकत्र असल्यामुळे आम्ही एकत्र काम करू”, असंही दानवेंनी सांगितलं. काहीवेळी पूर्वी रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली. त्यानंतर टीव्ही 9 नराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

“ती जागा कायम भाजपकडेच”

खोतकरांसोबतचे वाद मिटल्याचं जरी दानवेंनी सांगितलं असलं तरी जालन्याच्या राजकारणाची चावी भाजपच्याच हाती राहणार असल्याचं त्यांनी ठाणकावून सांगितलं आहे. जालना मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा कायम भाजपकडेच राहणार. आमच्यासाठी पक्षवरिष्ठांचा निर्णय महत्वाचा. त्यामुळे माझ्या जागी पक्षाने दुसरा जरी उमेदवार दिला तरी हरकत नाही. पण ही जागा भाजपकडेच राहणार, असं दानवे म्हणालेत.

“राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू”

राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र नाही. शत्रू नाही. क्षणिक काही गोष्टी घडतात आणि त्यातून मतभदे वाढत असतात. मी आणि अर्जुन खोतकर राज्यात आमचं सरकार नसतानाही आम्ही 25 वर्ष जिल्हा परिषद आम्ही ताब्यात ठेवली. डिसीसी बँक आम्ही ताब्यात ठेवली. सेना भाजपनं त्याही वेळी जालना जिल्ह्यावर वर्चवस्व ठेवलं होतं. आजही त्यांनी उल्लेख केला ते शिवसेनेत आहे. ही गोष्ट खरी आहे ते शिवसेनेत आहेत. आजही राज्यात सेना-भाजपचं सरकार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

रावसाहेब दानवेंविषयी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर अर्जुन खोतकर यांना विचारले असता त्यांनी या वक्तव्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, मी असं बोललो होतो, पण आठ दिवसांपूर्वी. गेली 40 वर्षे एकसंघ काम केलंय. जिल्ह्यात त्यांनी भाजप आणि मी शिवसेनेकडून जिल्हा सांभाळलाय. काही कारणाने कटूता आली होती. आता बघू ..अजूनही मी ठरवलं नाही. सहज भेट घ्यायला गेलो होतो.