Raosaheb Danve : येत्या निवडणुकीतही आमचेच सरकार येणार, धनुष्यबाण शिंदेंनाच मिळणार, हीच खरी सेना, रावसाहेब दानवेंचं भाकीत

गेल्या तीन दशकातील भाजप शिवसेनेची युती तुटत राज्यात अडीच वर्षांपूर्वी पहिल्यांदा महाविकास आघाडी स्थापन झाली होती. मात्र आता दानवेंच्या या विधानाने राजकारणाचे पुढची दिशा काय असणार? याचा अंदाज बांधणं कठीण झालंय.

Raosaheb Danve : येत्या निवडणुकीतही आमचेच सरकार येणार, धनुष्यबाण शिंदेंनाच मिळणार, हीच खरी सेना, रावसाहेब दानवेंचं भाकीत
येत्या निवडणुकीतही आमचेच सरकार येणार, धनुष्यबाण शिंदेंनाच मिळणार, हीच खरी सेना, रावसाहेब दावेंचं भाकीत
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 22, 2022 | 3:49 PM

नवी दिल्ली : दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन (Assembly Session) सुरू आहे. मात्र दिल्लीतल्या या पावसाळी अधिवेशनातही राजकारणाचा माहोल मात्र गरमागरमीचा पाहायला मिळतोय. तसेच आता भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.  राज्यात आता भाजप आणि शिवसेनेचे सरकार (BJP Shivsena Alliance) आहे. त्यामुळे पुढच्या वेळेसच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू, अशी घोषणाच रावसाहेब दानवे यांनी करून टाकली आहे. तसेच पुढच्या वेळेस ही भाजप आणि शिवसेनेचे सरकार निवडून येणार, असेही भाकीत वर्तवून टाकलंय. त्यामुळे पुन्हा नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. गेल्या तीन दशकातील भाजप शिवसेनेची युती तुटत राज्यात अडीच वर्षांपूर्वी पहिल्यांदा महाविकास आघाडी स्थापन झाली होती. मात्र आता दानवेंच्या या विधानाने राजकारणाचे पुढची दिशा काय असणार? याचा अंदाज बांधणं कठीण झालंय.

शिंदे यांनाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल

दरम्यान ज्यांच्याकडे जास्त संख्या त्याचा पक्ष असतो, त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदारांची संख्या आहे, तसेच जास्त खासदारांची संख्या आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. तसेच कुठल्याही संधीचा फायदा घेतला नाही, 2019 ला निवडणुका झाल्या तेव्हा सगळ्यांचे म्हणणं होतं की आपण भाजपसोबत युती करावी. ही युती जनतेला मान्य होती, मात्र मनाप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी युती केली, त्यामुळेच आज हा दिवस उजाडला असाही टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

अजित पवार यांचं कौतुक

तसेच आताची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, मतदारांना संभाळणारा आणि विचारणारा नेता नसेल तर ते काय करतील असा सवाल ही दानवे यांनी विचारला आहे. तसेच ती मत फुटली नाहीत त्यांनी सद्विवेक बुद्धीने मतदान केलं. आमचं सरकार चांगलं काम करेल. मात्र चुकीचं काय असेल तर दादांनी ते दाखवून द्यावं, दादांच्या कामाबद्दल वर्णन करणं सोयीचं नाही. मात्र स्वभाव त्यांचा चांगला आहे, असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकामावर रावसाहेब दानवे यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. तर शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला संपवायचं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना संपवायची होती, हे माहीत नाही. मात्र दोघे एकत्र बसायचे. आता खरी शिवसेना वेगळी झाले, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री उत्तर देऊ शकतील असे ते म्हणाले.