AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, रावसाहेब दानवेंचे टोले, मंत्री अब्दुल सत्तारांना ओपन चॅलेंज

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील सत्कार सोहळ्यात जोरदार बॅटिंग केली. सिल्लोडमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात रावसाहेब दानवेंनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना टोले लगावले.

गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, रावसाहेब दानवेंचे टोले, मंत्री अब्दुल सत्तारांना ओपन चॅलेंज
Abdul Sattar Raosaheb Danve
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 19, 2021 | 9:44 AM
Share

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मतदारसंघातील सत्कार सोहळ्यात जोरदार बॅटिंग केली. सिल्लोडमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात रावसाहेब दानवेंनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना टोले लगावले. मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे. तो नागरिकांना आमिष दाखवत आहे, असं रावसाहेब दानवे सत्तारांना उद्देशून म्हणाले.  अब्दुल सत्तार खूप झालं, 50 कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता 2400 कोटींचा केला. अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, मग बघू कोण हरतं ते, असं आव्हानही दानवेंनी दिलं.

चिरीमिरीचं नाही खेळावं. गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, शिवसेनेची शाखा काढत बसतं. मात्र या शिवसेनेच्या शाखा नाहीत, या सत्तारच्या शाखा आहेत. सत्तारला माझं चॅलेंज आहे सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी पाठीशी आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवे औरंगाबादत

दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपादाचा भार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच 17 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत दाखल झाले. मी आज पहिल्यांदा रेल्वे मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यात आलो, माझ्या कार्यकर्त्यांना आनंद झाला त्यांनी माझा सत्कार केला, मी कार्यकर्त्यांच्या बळावर मी इथपर्यंत पोचलो, मलाही आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली होती.

मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता, जिथे इंग्रज होते तिथे रेल्वेचं जाळ तयार झालं, मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर मुंबई हा सर्वाधिक वापरला जाऊ शकणार रेल्वे मार्ग बनू शकतो, तो बुलेट ट्रेन मार्ग जर तयार झाला तर मुंबईहून औरंगाबादला दीड तासात आणि नागपूरला 3 तासात आपण पोहोचू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम ते होऊ शकतं, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

VIDEO : रावसाहेब दानवेंचं अब्दुल सत्तारांना ओपन चॅलेंज

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली