अमेठीतील रुग्णाच्या मृत्यूबाबतचा स्‍मृती इराणींचा दावा खोटा?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

अमेठी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर आरोप करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अनेक दावे केले जातात. मात्र, हे दावे तपासले असता त्याचे वास्तव पूर्णपणे वेगळेच असल्याचे समोर येते. असाच प्रकार  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याबाबतही झाला आहे. इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या अमेठीतील रुग्णालयावर एका व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला […]

अमेठीतील रुग्णाच्या मृत्यूबाबतचा स्‍मृती इराणींचा दावा खोटा?
Follow us on

अमेठी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर आरोप करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अनेक दावे केले जातात. मात्र, हे दावे तपासले असता त्याचे वास्तव पूर्णपणे वेगळेच असल्याचे समोर येते. असाच प्रकार  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याबाबतही झाला आहे. इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या अमेठीतील रुग्णालयावर एका व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. मोदींनीही हेच आरोप करत राहुल गांधींवर टीका केली होती. मात्र, यामागील सत्य पूर्णपणे वेगळेच निघाले.

पंतप्रधान मोदी आणि स्‍मृती इराणी यांच्या व्यतिरिक्त मृत रुग्णाच्या नातेवाईकांनीही रुग्णालयावर आरोप केले होते. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, रुग्ण नन्‍हे लाल मिश्रा यांना आयुष्मान भारत योजना मोदी-योगींची असल्याचे सांगत संजय गांधी रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. तसेच या ठिकाणी फक्त राहुल गांधींची योजना चालते असेही सांगण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. यानंतर हा विषय देशभरातील माध्यमांनी उचलून धरला.


दुसरीकडे या प्रकरणाची शहानिशा केली असता वास्तव अगदी उलटे असल्याचे समोर आले आहे. टीव्ही 9 ने मृत रुग्ण नन्‍हें लाल मिश्राला ज्या रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे सांगितले, त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा संबंधित रुग्णाला 25 एप्रिलला रुग्णालयात दाखल केल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाला दारुचे व्यसन होते. त्यामुळेच त्याला भरती करण्यात आले होते. रुग्णालयाने मिश्रा यांना दाखल करुन घेतले, तेव्हा त्यांचे कुटुंबीय आयुष्‍मान कार्ड घेऊन येण्यास विसरले होते. तरिही रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला भरती करुन घेतले आणि आयुष्मान कार्ड दुसऱ्या दिवशी आणण्यास सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी या रुग्णाचा मृत्यू झाला आणि मग कुटुंबीय आयुष्मान कार्ड घेऊन आले. यावेळी रुग्णालयाने आता याक्षणी रुग्णाच्या भरतीची नोंद मागील तारखेला करता येणार नाही, असे सांगितले. रुग्णालयाने रुग्णाला दाखल करुन घेतल्याचे रजिस्टर आणि मृत्यूचे प्रमाणपत्रही सादर केले आहे.