AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकू सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवारांनी चांगलंच सुनावलं; सगळं बाहेर काढलं!

अजित पवार आमची पुरोगामी विचारधारा आहे, असे सांगतात. मात्र त्यांच्या पत्नी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, आता अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनीही सुनेत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांना चांगलंच सुनावलं आहे.

काकू सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवारांनी चांगलंच सुनावलं; सगळं बाहेर काढलं!
sunetra pawar and rohit pawar
| Updated on: Aug 21, 2025 | 4:32 PM
Share

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार तथा खासदार सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचा एक फोटो समोर आला असून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार आमची पुरोगामी विचारधारा आहे, असे सांगतात. मात्र त्यांच्या पत्नी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, आता अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनीही सुनेत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांना चांगलंच सुनावलं आहे.

त्यांच्यावर कदाचित दबाव असावा

रोहित पवार आज माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. यावेळी पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रोहित पवारांनी सडकून टीका केली आहे. “जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं. तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हेदेखील त्यांनी आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारायला हवं. मला वाटतं की अजित पवार सत्तेत गेले आहेत. त्याची कारणं वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर अजितदादांनी संघाचे विचार स्वीकारले नसतील. मात्र त्यांच्यावर कदाचित दबाव असावा. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, असा दबाव त्यांच्यावर टाकला जात असावा. असा फोटो बाहेर आला की हेसुद्धा आरएसएसचा विचार स्वीकारायला लागले आहेत, असा संदेश बाहेर जातो, असा हेतू असावा,” असे रोहित पवार म्हणाले.

…तर ही दुटप्पी भूमिका आहे

तसेच, एका बाजूला आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, असे सांगितले जाते. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेतले जाते. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेतले जाते. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही आरएसएसच्या बैठकीला जात असाल, तुमचे प्रतिनिधी आरएसएसच्या बैठकीला जात असतील तर ही दुटप्पी भूमिका आहे, अशी थेट टीकाही रोहित पवारांनी केली. तसेच आज राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नको आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवारांनाही टोला लगावला आहे.

सुनेत्रा पवार यांनी दिले स्पष्टीकरण

तर संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दात माझी भूमिका मांडली, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच, कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील, असे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले आहे.

कंगना रणौत यांच्या फोटोत काय होतं?

दरम्यान, भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी त्याच्या ट्विटर खात्यावर काही फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो अपलोड करताना माझ्या घरी राष्ट्र सेविका समितीच्या महिला शाखेचे आयोजन झाले. आम्ही सर्वजणी सनातन मूल्य, हिंदू संस्कृती, राष्ट्रीय जेतना कायम ठेवण्याचा प्रयत्न करू, असे कंगना रनौत यांनी म्हटलंय. कंगना यांनी ट्विट केलेल्या याच फोटोंमध्ये सुनेत्रा पवार या उभे राहून भाषण करताना दिसत आहेत. याच फोटोमुळे आता वाद निर्माण झाला आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट