‘माजी ED अधिकाऱ्याला भाजपचं UPमध्ये तिकीट’ रोहित पवारांच्या वक्तव्यामागचा ‘तो’ BJP उमेदवार हाच!

| Updated on: Feb 23, 2022 | 2:08 PM

Rohit Pawar on Nawab Malik : रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपनं उत्तर प्रदेशात एका माजी ईडी अधिकाऱ्याला उमेदवारी दिली आहे. या अधिकाऱ्याचं नाव सिंह असं असल्याचं रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

माजी ED अधिकाऱ्याला भाजपचं UPमध्ये तिकीट रोहित पवारांच्या वक्तव्यामागचा तो BJP उमेदवार हाच!
रोहित पवार यांनी उल्लेख केलेला तो माजी ईडी अधिकारी कोण आहे?
Follow us on

मुंबई : आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरुन भाजपवर संशय घेतला आहे. या कारवाईनं अनेक प्रश्न उपस्थित झाले असून अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या असल्याचं ते म्हणालेत. दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना आधी आपल्या इशाऱ्यावर काम करायला लावायचं आणि नंतत त्यांचं राजकीय पुनर्वसनं करायचं, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवार यांनी उत्तर प्रदेशात एका माजी अधिकाऱ्याला (Former ED Officer) भाजपनं तिकीट दिल्याचा प्रकार, हे त्याचंच उदाहरण असल्याचंही म्हटलं आहे. एकूणच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन यूपीतील (UP Assembly Elections 2022) नेत्यांनाही थेट संदेश देण्याचा इशारा मलिकांवर करण्यात आलेल्या कारवाईतून सुरु असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान, ज्या माजी अधिकाऱ्याबाबत रोहित पवार यांनी उल्लेख केलाय, तो नेमका कोण उमेदवार आहे, याचीही चर्चा यानिमित्तानं रंगली आहे.

कोण आहे तो माजी अधिकारी?

रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपनं उत्तर प्रदेशात एका माजी ईडी अधिकाऱ्याला उमेदवारी दिली आहे. या अधिकाऱ्याचं नाव सिंह असं असल्याचं रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. रोहित पवार यांनी म्हटलंय की,…

यूपीत सिंग नावाचे एक माजी ईडी अधिकारी आहेत… जे महत्त्वाच्या केस हॅन्डल करायचे. त्यांना भाजपनं उमेदवारी दिली. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणाना ‘आम्ही सांगू तसं करा’ असं म्हणायचं आणि मग तुमचं राजकीय पुनर्वसन करु, असाही संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून केलेला असू शकतो.

हाच तो माजी ईडी अधिकारी!

रोहित पवार यांनी उल्लेख केलेल्या त्या उमेदवाराचं नाव आहे राजेश्वर सिंह. भाजपनं उत्तर प्रदेशातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौमधून राजेश्वर सिंह यांनी भाजपनं सरोजिनीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. राजेश्वर सिंह हे ईडीचे जॉईंट डायरेक्टर राहिलेले आहेत. त्यांनी राजकारणात इन्ट्री घेण्यासाठी व्हिआरएस घेतला होती. त्यानंतर 24 तासांच्या आतच त्यांना भाजपनं आपली उमेदवारी देत असल्याची घो,णा केली होती.

राजेश्वर सिंह यांचा अल्पपरिचय

  1. राजेश्वर सिंह 1996 बॅचचे पीपीएस (पोलिस) अधिकारी
  2. लखनौमध्ये असताना एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख
  3. 13 एन्काऊंटर केल्याची माहिती
  4. सायबर जेम्स बॉन्ड म्हणूनही त्यांना ओळखलं जातं
  5. 2009 साली राजेश्वर सिंह ईडीमध्ये
  6. अनेक घोटाळ्यांची राजेश्वर यांच्याकडून चौकशी
  7. टू-जी स्प्रेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, अगस्ट वेस्टलॅन्ड घोटाळ्याच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका
  8. राजेश्वर सिंह मूळचे यूपीतल्या सुलतानपू र जिल्ह्यातले
  9. इंजिनिअरची पदवी घेतलेल्या राजेश्वर सिंहांचं वकिलीतही शिक्षण
  10. त्यांनी पत्नी सध्या लखनौमध्ये आयजी

राजकारण का तापलं?

महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री असलेले अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर भल्या पहाटे ईडी अधिकारी पोहोचले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन गेले. या सगळ्या प्रकारानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आर्यन खान आणि क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिका यांनी एनसीबीवर संशयाचे ढग निर्माण केले होते. त्यांनी समोर आणलेल्या वेगवेगळ्या कागदपत्रांनंतर एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीन वानखेडेंनाही आता चौकशीला सामोरं जावं लागलंय.

पाहा व्हिडीओ –

एकूणच मलिकांवर करण्यात आलेली कारवाई ही सूडाच्या भावनेनं केली असल्याचा सूर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ऐकायला मिळतोय. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणुका आणि नवाब मलिकांवर करण्यात आलेली कारवाई याचा एकमेकांशी संबंध जोडून भाजपवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या :

Video | ‘आज ना उद्या हे घडेल याची खात्री होतीच’, मलिकांच्या ईडी चौकशीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया

पहाटे 4.30 वा. नवाब मलिकांच्या घरी ईडी अधिकाऱ्यांची धडक, चौकशी सुरु

‘कुणाला तरी कुर्बान व्हावं लागेलच, एकेका अधिकाऱ्याला एक्सपोज करेन’ संजय राऊत यांचा थेट इशारा