Rupali Chakankar: अशोक खरातची पाद्यपूजा का केली? महिलांना कॅप्टनकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळच सांगून टाकलं

Rupali Chakankar: राज्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत होते. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव घेतले जात होते. आता रुपाली चाकणकर यांनी व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंमागील सत्य सांगितले आहे.

Rupali Chakankar: अशोक खरातची पाद्यपूजा का केली? महिलांना कॅप्टनकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळच सांगून टाकलं
Rupali Chakankar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 8:55 AM

काही महिन्यांपूर्वी भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. या भोंदूबाबाने अनेक महिलांना दैवी शक्ती असल्याचे सांगत फसवले. त्याने महिलांवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरण चर्चेत असताना राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत होत्या. आता त्यांनी या व्हिडीओ मागील सत्य सांगितले आहे.

रुपाली चाकणकर यांनी नुकताच ‘आरपार’ युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना अशोक खरातची पाद्यपूजा का केली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, गुरुपोर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी मोठी गर्दी जमते. २०२१-२२ साली आम्हीही त्या कार्यक्रमाला गेलो होतो. आमचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असल्याने माझे बाबाही सोबत होते. त्यावेळी कार्यक्रमाला अत्यंत उच्चशिक्षित लोक उपस्थित होते. आम्हाला जायला थोडा उशीर झाल्याने आम्ही मागच्या बाकांवर बसलो. मात्र स्टेजवर अनेक मोठे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आधीच खरात यांची पाद्यपूजा केली होती. अनेक महिलांनी खरातांचे औक्षणही केले होते.

Loading...

पुढे त्या म्हणाल्या की, त्यानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला खरातांची पाद्यपूजा करण्यासाठी आग्रह करण्यात आला. मला पूजा करायची नव्हती. पण त्यावेळी विरोध केला असता तर तिथे उपस्थित लोकांमध्ये वेगळा संदेश गेला असता. त्यामुळे मी पाद्यपूजा केली. मात्र त्यापलीकडे मी काहीही केले नाही.

“हा २०२१-२२ सालचा व्हिडिओ “

शेवटी त्या म्हणाल्या की, माझ्या कुटुंबानेही पाद्यपूजा केली. स्टेजवर असलेल्या अनेक मोठ्या लोकांनीही आधी पाद्यपूजा केली होती. तरीही फक्त माझाच व्हिडिओ व्हायरल झाला. हा २०२१-२२ सालचा व्हिडिओ आहे. त्यानंतर दोन वर्षांच्या काळात मी मंदिरातही गेले नव्हते. फक्त पाद्यपूजा केल्यामुळे मी आरोपी ठरत असेन, तर त्याआधी ज्यांनी पाद्यपूजा केली त्यांना कोण प्रश्न विचारणार आहे की नाही? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us