“पंतप्रधान भाबडे, निरागस, निष्पाप”, सामनातून नरेंद्र मोदींना फटकारले

| Updated on: Sep 06, 2022 | 5:26 PM

Narendra Modi: आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोले लगावण्यात आले आहेत. भाबडे, निरागस, निष्पाप पंतप्रधान म्हणत मोदींवर टीका करण्यात आली आहे.

पंतप्रधान भाबडे, निरागस, निष्पाप, सामनातून नरेंद्र मोदींना फटकारले
Follow us on

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) टोले लगावण्यात आले आहेत. भाबडे, निरागस, निष्पाप पंतप्रधान म्हणत मोदींवर टीका करण्यात आली आहे. “नितीश कुमार हे 2024 ला आव्हान ठरू शकतील असे भय मोदी यांना आतापासून का वाटावे? मोदी यांनी एक वार केला की नितीश पलटवार करून उत्तर देतात. त्यावर भक्तांची तोंडे बंद होतात. पंतप्रधान मोदी यांनी आता जे राजकीय गटाचे टुमणे सुरू केले, पण तो वार त्यांच्यावरच उलटला आहे. भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येत आहे, हे त्यांचे म्हणणे जर खरे मानले तर महाराष्ट्रातील भाजपच्या मांडीवर बसलेला ‘शिंदे गट’ हेच त्याचे उत्तर आहे. मोदी भाबडे आहेत. निरागस आहेत. निष्पाप आहेत. त्यांना कोणी तरी सत्य माहिती द्यायला हवी”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

सामनातून टीका

आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे मन एखाद्या अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप आहे. बालकाच्या हाती एखादे खेळणे वगैरे दिल्यावर ते आपल्याच धुंदीत, मजेत खेळत बसते. आजूबाजूला काय चालले आहे याच्याशी त्या बालकास घेणेदेणे नसते. आपले पंतप्रधान हे तसेच आहेत. नरेंद्र भाईंनी दोन दिवसांपूर्वी एक निरागस व निष्कपट विधान केले.

हे सुद्धा वाचा

नितीश कुमार हे 2024 ला आव्हान ठरू शकतील असे भय मोदी यांना आतापासून का वाटावे? नितीश कुमारांचे नेतृत्व उत्तरेत वरचढ ठरू शकेल व त्याचा फटका भाजपला बसेल असा लोकांचा अंदाज आहे. मोदी यांनी एक वार केला की नितीश लगेच पलटवार करून उत्तर देतात. त्यावर भक्तांची तोडे बंद होतात. पंतप्रधान मोदी यांनी आता जे राजकीय गटाचे सुरू केले, पण तो वार त्यांच्यावरच उलटला आहे. भ्रष्टाचारयांवरील कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येत आहे, हे त्यांचे म्हणणे जर खरे मानले तर महाराष्ट्रातील भाजपच्या मांडीवर बसलेला ‘शिंदे गट’ हेच त्याचे उत्तर आहे. मोदी भाबडे आहेत. निरागस आहेत. निष्पाप आहेत. त्यांना कोणी तरी सत्य माहिती द्यायला हवी.