पुण्यातून संभाजी ब्रिगेडकडून संजय काकडे रिंगणात : सूत्र

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार हे निश्चित झाले असून, संभाजी ब्रिगेडचे ते उमेदवार असतील, असी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसही पुण्यातील जागा संभाजी ब्रिगेडसाठी सोडणार आहे. म्हणजेच, संजय काकडे यांना उमेदवारी देऊन काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित पुण्यात भाजपला टक्कर देण्याची तयारी करत आहे, अशीही माहिती […]

पुण्यातून संभाजी ब्रिगेडकडून संजय काकडे रिंगणात : सूत्र
Follow us on

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार हे निश्चित झाले असून, संभाजी ब्रिगेडचे ते उमेदवार असतील, असी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसही पुण्यातील जागा संभाजी ब्रिगेडसाठी सोडणार आहे. म्हणजेच, संजय काकडे यांना उमेदवारी देऊन काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित पुण्यात भाजपला टक्कर देण्याची तयारी करत आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करु, संभाजी ब्रिगेडची काकडेंना ऑफर

दोनच दिवसांपूर्वी संजय काकडे यांना संभाजी ब्रिगेडने पुण्यातून लोकसभा लढण्याची ऑफर दिली होती. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना पुण्यातून उमेदवारी देण्याची तयारी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.

“सध्या संजय काकडे हे उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षांकडे रोज मागणी करत आहेत. पण काकडे यांची होणारी फरपट पाहवत नाही, भाजपला संजय काकडे यांची किंमत नाही, आणि काँग्रेस संजय काकडे यांना स्वीकारायला तयार नाही. याचा अर्थ संजय काकडेंनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ‘संभाजी ब्रिगेड’ मध्ये सहभागी व्हावं आणि कर्तुत्वान खासदार संजय काकडेंनी ‘संभाजी ब्रिगेड’कडून लोकसभा निवडणूक लढवावीठ, अशी ऑफर संभाजी ब्रिगेडने दिली.

संजय काकडे कोण आहेत?

संजय काकडे हे सध्या भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार आहेत. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले. काकडे हे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ असे त्यांच्या बांधकाम कंपनीचे नाव आहे. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. भाजपचे सहयोगी खासदार असले, तरी सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत. मात्र त्यांनी गेल्या काही निवडणुकांच्या निमित्ताने भाजपवर शरसंधान साधलं.