Sanjay Raut ED Raid : अशी घाण कुठल्याच पक्षाला नकोयं… नितेश राणेंची राऊतांवर सडकून टीका

केदार दिघेना आताच आनंद दिघे का आठवले? एवढी वर्षे तो कुठे होता?तो संशोधनाचा प्रश्न आहे. आनंद दिघे बरोबर राहणाऱ्या एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांनी जे अनुभवलय ते फक्त याच काही लोकांना माहीती आहे.

Sanjay Raut ED Raid : अशी घाण कुठल्याच पक्षाला नकोयं... नितेश राणेंची राऊतांवर सडकून टीका
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांचं पालिका आयुक्तांना पत्र, आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा
| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 12:17 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर अनेक मोठ्या घडामोडी राज्यात सुरू आहेत. ईडीच्या कारवाईवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यावर नितेश राणे यांनीही मोठे भाष्य करत संजय राऊतांवर जोरदार प्रहार केलायं. tv9 शी बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, दिवाळीच्या वेळी एक साबणाची जाहिरात यायची उठा उठा मोती स्नान करण्याची वेळ आली. उठा उठा आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या बाजूला जेवणाची वेळ आली. कोणाला कुठे झुकाव लागत हे आता संजय राऊत यांना कळेल. आजची ईडी (ED) चौकशी ही त्यांनी अंगावर ओढून घेतलेली आहे. तिन्ही वेळा जर चौकशीला सामोरे गेले असते तर आजची सकाळ त्यांची खराब आणि आमची चांगली झाली नसती.

प्रवीण राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप

स्वप्ना पाटकरांची ऑडिओ क्लीपमध्ये स्वतः संजय राऊत बोलता आहेत, की ती जमीन माझ्या नावावर कर नाहीतर प्रवीण राऊत यांच्या नावावर कर. प्रवीण राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून ईडीच्या कस्टडीत आहेत. अशा व्यक्ती बरोबर जर तुमचे संबंध असतील, जमीन तुम्ही तुमच्या किंवा त्याच्या नावावर करायचं बोलत असाल तर मग तुमची चौकशी करायलाच लागेल.

अशी घाण कोणत्याच पक्षाला नकोयं…

संजय राऊत यांना कोणीही शरण जायला सांगत नाही आहे. अशी घाण कुठल्याच पक्षाला नको. ही घाण आहे, उद्धव ठाकरे अजूनपर्यंत ही घाण कशी सहन करत होते हे त्यांनाच माहीत. आज तुम्हाला बाळासाहेबांच्या शपथा घ्याव्याशा वाटतात, याच बाळासाहेबांबद्दल त्यांच्या कुटबियांबद्दल तुम्ही लोकप्रभामध्ये काय लिहायचा? बाळासाहेब आणि त्यांच्या मुलाला पोचवतो असं वक्तव्य करणारा हा संजय राऊत आहे. म्हणून त्याला बाळासाहेबांच नाव घ्यायचा अधिकारच नाही.

नितेश राणे यांनी केली राऊतांवर सडकून टिका

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, शिंदे गटातील आमदार आज निश्चित समाधानी असणार. कारण जे जे शिवसेनेवर प्रेम करतात.जे जे बाळासाहेबांचे निष्ठावान सैनिक आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे शिवसेना संपवायला हा संजय राऊत मुख्य कारणीभूत आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व हे पवार साहेबांच्या पायाखाली नेऊन ठेवलं, शिवसेना सारखा जुना पक्ष संपवण्याचा प्रयत्न यांनी केला. ठाकरे कुटुंबियाला जे काय आज दिवस दाखवले त्याचा प्रमुख जबाबदार हा संजय राऊत आहे. त्या संजय राऊतवर कारवाई होत असेल, अटक होत असेल तर प्रत्येक शिवसैनिक हा निश्चितपणे समाधानी होईल.

तर ठाकरे कुटुंबाला कायमस्वरूपी लंडनला जावे लागेल

केदार दिघेना आताच आनंद दिघे का आठवले? एवढी वर्षे तो कुठे होता?तो संशोधनाचा प्रश्न आहे. आनंद दिघे बरोबर राहणाऱ्या एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांनी जे अनुभवलय ते फक्त याच काही लोकांना माहीती आहे. उद्धवजीनी टीव्ही समोर येऊन जास्त तोंड उघडण्याचा प्रयत्न केला, आम्हाला जास्त अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर जस शिंदे साहेब बोलले तसे जर त्यांनी तोंड उघडले तर ठाकरे कुटुंबाला कायमस्वरूपी लंडनला जावं लागेल, असेही नितेश राणे म्हटले आहेत.