Sanjay Raut ED Inquiry : संजय राऊत ईडीच्या ताब्यात; ईडीकडील काही कागदपत्रांमध्ये वर्षा संजय राऊतांचा उल्लेख?

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर ईडीकडे काही कागदपत्रे आहेत, त्यात वर्षा संजय राऊत (Varsha Sanjay Raut) यांचा उल्लेख असल्याचीही माहिती मिळतेय.

Sanjay Raut ED Inquiry : संजय राऊत ईडीच्या ताब्यात; ईडीकडील काही कागदपत्रांमध्ये वर्षा संजय राऊतांचा उल्लेख?
संजय राऊत, वर्षा राऊत
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 10:47 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीनं ताब्यात घेतलं आहे. रविवारी सकाळीच ईडीचं पथक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी दाखल झालं. तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर ईडीचे अधिकारी राऊत यांना कार्यालयात घेऊन आले. संजय राऊतांवरील कारवाईनंतर विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका केली जातेय. मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाले आहेत. त्याचबरोबर ईडीकडे काही कागदपत्रे आहेत, त्यात वर्षा संजय राऊत (Varsha Sanjay Raut) यांचा उल्लेख असल्याचीही माहिती मिळतेय.

ईडीकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये वर्षा संजय राऊत यांचा उल्लेख आहे. या कागदपत्रांमध्ये असलेल्या माहितीनुसार,

  1. अवनी इन्फ्रास्ट्रक्चरने सांताक्रुझमध्ये इमारत बांधली होती. त्यातून वर्षा राऊत यांना 14 लाख रुपये नफा झाला. त्यात वर्षा राऊत यांनी 5 हजार 625 रुपये गुंतवले होते. त्या कंपनीच्या भागीदार होत्यात माधुरी प्रवीण राऊत, प्रतिमा चंदन कालेकर आणि वर्षा संजय राऊत.
  2. माधुरी राऊत यांनी याच प्रकल्पात 13 लाख 5 हजार रुपये गुंतवले होते आणि 14 लाखांचा नफा कमावला होता. कालेकर यांनी 10 लाखांची गुंतवणूक केली होती आणि त्यांना 28 लाखांचा नफा झाला.
  3. पत्रा चाळ प्रकरणी ईडीने प्रवीण राऊतला अटक केली होती. ज्यामध्ये ईडी ने म्हटले होते की, त्यांना गुन्ह्याचे 50 कोटी रुपये मिळाले होते.
  4. यापूर्वी, ईडीने 11 कोटी 15 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता देखील जप्त केली आहे. ज्यामध्ये वर्षा राऊत यांचा दादरमध्ये फ्लॅट आणि अलिबागजवळील किहीम मध्ये आठ जमिनी आहेत. ज्या स्वप्ना पाटकर यांचीही जमीन आहे. स्वप्ना ही संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची पत्नी आहे.
  5. ईडीच्या म्हणण्यानुसार प्रवीण राऊतला एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले होते, जे त्याने त्याच्या जवळच्या मित्रांच्या बँक खात्यात जमा केले होते.

राऊतांच्या घरी मिलाले 11 लाख 50 हजार

संजय राऊत यांच्या घरून ईडीला 11 लाख 50 हजार रुपये सापडले आहेत आणि ते ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आलीय. सुनील राऊत जे संजय राऊत यांचे बंधू आहेत, त्यांनी सांगितलं होतं की गोरेगाव पत्राचाळ संबंधित कोणत्याही एक कागद ईडीच्या हाती लागला नाही. मात्र अनेक कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.