Sanjay Raut : प. बंगाल मेट्रो डेअरीवरुन संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा! काय आहे नेमकी क्रोनोलॉजी?

पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणाची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी केली जात आहे. त्याच मेट्रो डेअरीने किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रूपयांची देणगी दिली आहे.

Sanjay Raut : प. बंगाल मेट्रो डेअरीवरुन संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा! काय आहे नेमकी क्रोनोलॉजी?
प. बंगाल मेट्रो डेअरीवरुन संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा!
Image Credit source: tv9
| Updated on: May 10, 2022 | 8:57 AM

मुंबई – संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात रोज आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोरोनाच्या (Corona) काळात घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा नील सोमय्या या दोघांनी मिळून आयएनएस विक्रांतच्या नावाखाली घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांनी काल एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी ‘इंतजार करो कलतक!’असा आशय लिहिला आहे. तसेच कालचं ट्विट त्यांनी देशातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना टॅग सुध्दा केलं आहे. आज त्यांनी सकाळी दुसरं ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मेट्रो डेअरीने किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रुपयांची देणगी दिली आहे असं ट्विट केलं आहे.

मेट्रो डेअरी प्रकरणाची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी

पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी प्रकरणाची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी केली जात आहे. त्याच मेट्रो डेअरीने किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रूपयांची देणगी दिली आहे. क्रोनोलॉजी समजून घ्या, हिसाब तो देना पडेगा भाई ! असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोमवारी सुध्दा त्यांनी एक ट्विट केलं होतं. तसेच आज सकाळी त्याबाबत दुसरं ट्विट
केलं आहे. त्यामुळे आज दिवसभर काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रा.डॉ.मेधा किरीट सोमय्या यांनी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत कोणत्याही आधाराशिवाय अनुचित विधान करत असल्याचा आरोप मेधा किरीट सोमय्या यांनी केला आहे.