AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याच्या दिवशी का खातात कडुनिंबाची पानं?, फार कमी लोकांना माहीत असेल हे कारण

यंदा 19 मार्च 2026 रोजी गुढी पाजवा असून हिंदू नववर्षाची सुरूवात होत आहे. देवांचा गुरु बृहस्पती या वर्षाचा राजा असेल. या मंगलदिनी कडुलिंब खाण्याची अनोखी परंपरा आहे, जे आपल्या जीवनातील चढ-उतार स्वीकारण्याचे प्रतीक मानलं जाते. तसेच, वसंत ऋतूतील बदलत्या हवामानात आरोग्यासाठीही कडुलिंबाचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे संसर्ग व ॲलर्जीपासून संरक्षण मिळते.

Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याच्या दिवशी का खातात कडुनिंबाची पानं?, फार कमी लोकांना माहीत असेल हे कारण
हिंदू नवं वर्षImage Credit source: AI
| Updated on: Mar 16, 2026 | 3:30 PM
Share

Hindu Nav Varsh 2026 : हिंदू धर्मात नवं संवत्सर म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरूवात खूप खास, महत्वाची मानली जाते. दर वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला तिथीने हिंदू नव वर्ष सुरू होतं. तोच दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा हा गुरूवारी, 19 मार्च रोजी येणार आहे. याच दिवसापासून विक्रम संवत्सर 2083 सुरू होणार आहे. आणि या वर्षी गुढी पाडवा गुरूवारी येत असल्यानेदेवांचा गुरु बृहस्पति हा या नवीन वर्षाचा राजा मानला जाईल.

ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षं ज्या दिवशी येतं, तो दिवस ज्या ग्रहाचा असतो, तो ग्रह त्याचा राजा मानला जातो. या नवीन वर्षाचा अधिपती मंगळ असेल. महाराष्ट्रात हिंदू नववर्षाच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. लोक भल्या पहाटे उठून स्नान करतात आणि गुढी उभारून, तिची पूजा करून, नैवेद्य दाखवतात. मात्र याच दिवशी अनेक ठिकाणी कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का. गुढी पाडव्याच्या साची सुरूवता कडू अशी पानं खाऊ का करतात, त्या मागे काय शास्त्र् आहे ? चला जाणून घेऊया.

कडुनिंबाची पानं खाण्याची परंपरा

भारतातील अनेक भागात हिंदू नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. विशेषतः महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात उगादीच्या वेळी लोक या दिवशी कडुलिंबाची पानं आवर्जून खातात. अनेक ठिकाणी कडुलिंबाची पानं ही गूळ, चिंच किंवा कैरीसोबतही मिसळून खाल्ली जातात. धार्मिक मान्यतेनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुलिंबाची पाने खाणं म्हणजे, जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचा स्वीकार करण, त्यांना सामरो जाणं, असं प्रतीक मानलं जातं.

कडूनिंबाची पानं खाण्याचे फायदे

कडूनिंबाची पाने आपण स्वतःलाच एका प्रकारे संदेश देतो, की येणारं हे नवं वर्ष आनंद-दु:ख, यश आणि आव्हानांनी भरलेलं असू शकतं. आपण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असलं पाहिजे. शिवाय, ही परंपरा आरोग्याशी देखील जोडलेली आहे. हिंदू नववर्ष सामान्यतः वसंत ऋतूमध्ये येते, तेव्हा हवामान बदलतं. यावेळी, संसर्ग आणि ॲलर्जीचा धोका वाढतो. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीर शुद्ध होते आणि रोगांपासून संरक्षण होते असं मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच