भाजप मनसेत आमचेच एकेकाळचे सहकारी, पण किती लोकांना माझी चिंता?- संजय राऊत

| Updated on: Nov 21, 2022 | 10:19 AM

राहुल गांधी यांचा संजय राऊत यांना फोन! तब्बेतीची विचारपूस केल्याची राऊतांची माहिती, नंतर विरोधकांनाही सुनावलं

भाजप मनसेत आमचेच एकेकाळचे सहकारी, पण किती लोकांना माझी चिंता?- संजय राऊत
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी फोन करुन विचारपूस केली. खुद्द संजय राऊत यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी रविवारी रात्री राहुल गांधी यांच्याशी फोनवरुन आपलं बोलणं झालेलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी भाजप आणि मनसे (BJP And MNS) या पक्षांवरही थेट निशाणा साधला.

राजकीय मतभेत असतानाही राहुल गांधी यांनी मैत्रीखातर, प्रेमाखातर आपल्याला फोन केला, ही आपल्या देशाची राजकीय संस्कृती आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे एकेकाळी आपचे सहकारी असणारे आणि आता इतर पक्षात असणाऱ्या लोकांनी आपली विचारपूस न केल्याची खंतही राऊतांनी व्यक्त केली. संजय राऊत यांनी म्हटलं, की…

आज महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात पक्षात आमेचे मित्र आहेत. कधी ना कधी आम्ही एकत्र काम केलेलंय. पण राजकारण आज मित्र.. मित्र राहिलेला नसताता राहुल गांधी यांचा मला फोन येणं ही माझ्यासाठी मोठी गोष्य आहे.

भाजप, मनसे यांच्यात आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. पण त्या लोकांना माझी किती चिंताय? त्यांना तरत आनंद झाला मी जेलमध्ये गेल्यावर. याला राजकारण नाही म्हणत.

भाजप आणि मनसेवर निशाणा लगावत असताना संजय राऊत यांनी या दोन्ही पक्षांच्या राजकारणाची तुलना मुघलांच्या राजकारणाशी केला. ‘हे तर मुघलांच्या काळातलं राजकारण झालं’ असं म्हणज संजय राऊत यांनी जोरदार शब्दांत टोला लगावला.

राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं कायम ठेवतात, असंही संजय राऊत म्हणाले. भारत जोडो यात्रेला त्यामुळे देशभरातूल समर्थन मिळत असल्याचंही ते म्हणाले.

राहुल लोकांना आपला वाटतोय, तो यासाठीच, असं संजय राऊत यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. भारत जोडो यात्रेच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून राहुल गांधी यांनी आपली विचारपूस केल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. भगतसिंह कोश्यारी यांना माफी मागावीच लागेल, असंही ते म्हणाले.