संजय राऊतांना वेड्याच्या रुग्णालयात ठेवण्याची गरज : रावसाहेब दानवे

| Updated on: Nov 25, 2019 | 6:02 PM

"संजय राऊत यांना काय बोलावे आणि काय बोलू नये हे त्यांना आताही समजत नाही," असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांना वेड्याच्या रुग्णालयात ठेवण्याची गरज : रावसाहेब दानवे
Follow us on

मुंबई : “सत्तेची वाट पाहणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांना वेड लागलं (Raoshaheb danve criticizes sanjay raut) आहे. त्यांना वेड्याच्या रुग्णालयात ठेवण्याची गरज आहे.” अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर (Raoshaheb danve criticizes sanjay raut) केली. “संजय राऊत यांना काय बोलावे आणि काय बोलू नये हे त्यांना आताही समजत नाही,” असेही ते यावेळी म्हणाले. भाजपने पत्रकार परिषदेदरम्यान हे वक्तव्य (Raoshaheb danve criticizes sanjay raut) केलं.

“संजय राऊत याआधी अनेकदा म्हणाले आहे, की भाजपच्या नेत्यांना वेड लागलं आहे. पण आम्ही काही आज सत्तेत आलेलो नाही. अनेक वेळा सत्तेत आलो आहे. मात्र सत्ता येण्याची वाट पाहात असताना संजय राऊतांना वेड लागलं आहे. त्यांना कुठल्यातरी वेड्याच्या रुग्णालयात ठेवण्याची वेळ आली आहे. त्यांना आताही काय बोलावे आणि काय बोलू नये हे समजत नाही.” अशी टीका रावसाहेब दानवे यांनी (Raoshaheb danve criticizes sanjay raut) केली.

“खरतर एवढ्या राजकीय नाट्यामध्ये शिवसेनेला स्वत:चा वकीलही अजून नीट शोधता आलेला नाही. ज्या कपिल सिब्बल यांनी आता कोर्टात शिवसेनेची बाजू मांडली. त्यांनी राम मंदिर होऊ नये. भगवान श्री राम काल्पनिक आहेत. त्यामुळे राम मंदिर बांधू नये म्हटलं होतं.” असेही ते म्हणाले.

“संजय राऊत यांनी मे 2014 ला सामनात अग्रलेख लिहिला होता. कपिल सिब्बल दारु पिऊन उच्छाद मांडणारा माकड आहे असे लिहिले होते. तेच सिब्बल आता शिवसेनेचे वकील आहेत,” असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

“राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी स्वतः उपस्थित राहून आमदारांचं समर्थन दाखवलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केल्याचा संजय राऊत यांचा आरोप चुकीचा आहे. अजित पवार जो व्हीप काढतील तोच राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होईल. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते आहे. त्यामुळे त्यांनी जारी केलेला व्हीप हा सर्व आमदारांना लागू होईल,” असेही दानवे (Raoshaheb danve criticizes sanjay raut) म्हणाले.

“शेतकरी अडचणीत असताना भाजप आमदार शेतकऱ्याच्या बांधावर आहे. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे,” अशी टीकाही दानवे यांनी केली.