देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार ‘सरदार उधम सिंह’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का? काँग्रेसचा सवाल

'सरदार उधमसिंह हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या जाज्वल्य इतिसाहातील एक सोनेरी अध्याय आहे. ब्रिटींशांबद्दलचा कळवळा दाखवून उधमसिंह यांच्या देशप्रेमाचा, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा हा अपमानच आहे. देशप्रेमाचे सतत उमाळे येणारे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार या विषयावर गप्प का?'

देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार ‘सरदार उधम सिंह’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का? काँग्रेसचा सवाल
Atul Londhe on Sardar Udham Singh Film
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 4:50 PM

मुंबई : ‘सरदार उधम’ चित्रपटात ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवण्यात आला असल्याचे कारण देत ज्युरींनी हा चित्रपट ऑस्कर नामांकनातून वगळणे हा १३० कोटी भारतीयांचा अपमान आहे. सरदार उधमसिंह हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या जाज्वल्य इतिसाहातील एक सोनेरी अध्याय आहे. ब्रिटींशांबद्दलचा कळवळा दाखवून उधमसिंह यांच्या देशप्रेमाचा, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा हा अपमानच आहे. देशप्रेमाचे सतत उमाळे येणारे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार या विषयावर गप्प का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे. (Sardar Udham Singh Film dropped out of the Oscar nominations, Atul Londhe criticizes BJP Government)

यासंदर्भात बोलताना लोंढे पुढे म्हणाले की, सरदार उधम चित्रपट हा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी वगळणे हे फक्त चित्रपटापुरते मर्यादित नसून तो समस्त भारतीय जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका निधड्या छातीच्या नायकावर हा चित्रपट बनवलेला आहे. चित्रपटाची निमिर्तीमुल्ये, दर्जा यात तो कुठे कमी पडल्याचे कारण नाही फक्त इंग्रजांबद्दलचा द्वेष हे ज्युरींचे कारण अत्यंत हास्यास्पद आहे.

‘..हे तर कोत्य मनोवृत्तीचे दर्शन’

जालीयनवाला बागेत जनरल डायरने शेकडो निरपराध व निष्पाप लोकांवर गोळ्या घालून नरसंहार केला. जालीयनवाला बाग नरसंहार हा भारतीयांच्या मनातील भळभळती जखम आहे. हे घडवून आणणाऱ्या जनरल डायरला गोळ्या घालून उधमसिंह यांनी या घटनेचा बदला घेतला. भारताच्या स्वातंत्र्यांसाठी लढताना ब्रिटिश सत्तेने अनन्वीत छळ केले. जालीयनवाला बाग हे त्याचेच एक उदाहरण आहे. स्वातंत्र्यासाठी हसत हसत सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांपैकी सरदार उधमसिंह हे एक आहेत. या चित्रटातून देशाभिमान जागृत होत असताना आजही ब्रिटिशांच्या अपमानाचे कारण पुढे केले जात असेल तर ते अत्यंत निषेधार्ह आहे. सरदार उधमसिंह जेलमध्ये असताना राम मोहम्मद सिंह आझाद असे नाम ठेवून सामाजिक एकतेचे प्रतिक बनले होते. या महान देशभक्ताची महती सांगणाऱ्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय सन्मानापासून रोखणे हे कोत्या मनोवृत्तीचे दर्शन आहे. देशप्रमाचे गोडवे गाणारा भाजपा यावर गप्प आहे हे मनाला वेदना देणारे व तेवढेच आश्चर्याचे वाटते, असे लोंढे म्हणाले.

सरदार उधम सिंह चित्रपट

सरदास उधम सिंह हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती शूजीत सरकार यांनी केलीय. हा चित्रपट सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारीत आहे. सरदार उधम सिंह यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला होता. विकी कौशलचा अभिनय आणि चित्रपटाचे कथानक या गोष्टींमुळे हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.

इतर बातम्या :

जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट नाहीच! राज्य सरकारचं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?

‘जलयुक्त शिवार योजने’ला ठाकरे सरकारची क्लीन चिट; फडणवीस म्हणतात, मला अतिशय आनंद होतोय !

Sardar Udham Singh Film dropped out of the Oscar nominations, Atul Londhe criticizes BJP Government

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.