शरद पवारांचा खास मोहरा मैदानात, उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार जवळपास निश्चित

| Updated on: Sep 19, 2019 | 6:48 PM

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil vs Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

शरद पवारांचा खास मोहरा मैदानात, उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार जवळपास निश्चित
Follow us on

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil vs Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil vs Udayanraje Bhosale) अशीच लढत होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मोठे आव्हान उभे राहू शकतं.

कोण आहेत श्रीनिवास पाटील?

  • श्रीनिवास पाटील अगोदर आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी होते.
  • शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना राजकारणात आणलं
  • श्रीनिवास पाटील हे 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात लोकसभा खासदार होते
  • 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या काळात सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम
  • राज्यपालपदाची कारकीर्द संपल्यानंतर पुन्हा पक्षासाठी काम सुरु

‘उमेदवार कोणीही असू द्या, मी लढणार’

माझ्या समोर उमेदवार पृथ्वीराज चव्हाण असतील तर काय झालं? का नसावेत? लोकशाही आहे. कुणीही उभे राहू द्या, मी उमेदवार आहेच. फक्त अभिजीत बिचकुलेचं (Abhijit Bichukale) नाव घेऊ नका मला अटक होईल, असा  टोला उदयनराजेंनी लगावला.

संबंधित बातम्या 

शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे भाजपमध्ये चालणार नाही, शिवसेनेची उदयनराजेंना समज  

अभिजीत बिचकुलेचं नाव घेऊ नका, मला अटक होईल : उदयनराजे भोसले   

उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल, अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश 

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?