पवारांनी तीनवेळा पक्ष बदलला, त्यांचाही बाप काढणार का? नाईकांचा आव्हाडांना सवाल

| Updated on: Mar 11, 2020 | 3:53 PM

आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड (Ganesh Naik asked Jitendra Awhad) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे.

पवारांनी तीनवेळा पक्ष बदलला, त्यांचाही बाप काढणार का? नाईकांचा आव्हाडांना सवाल
Follow us on

नवी मुंबई :शरद पवार यांनीदेखील तीन वेळा पक्ष बदलला आहे (Ganesh Naik asked Jitendra Awhad). मग शरद पवारांचीदेखील गणणा तुम्ही बाप बदलणाऱ्यांच्या औलादीमध्ये करणार आहात का?”, असा प्रश्न भाजप नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे (Ganesh Naik asked Jitendra Awhad). आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईक यांना “आम्ही बाप बदलणाऱ्यांमधील औलादी नाहीत”, असं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?

“मी पक्ष बदलल्याच्या अनुषंगाने जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलं आहे की, आमची पक्ष बदलणाऱ्यांची औलाद नाही. याचा अर्थ त्यांनी म्हटलं की, आम्ही बाप बदलणाऱ्यांची औलाद नाहीत. पण माणूस एकाएकी पक्ष बदलत नाही. आपल्या समाजकारण, राजकारणाला गती यावी किंवा स्वाभिमानाचं जतन व्हावं, या आणि अशा बऱ्याच गोष्टींतून माणूस पक्षांतर करतो”, असं स्पष्टीकरण गणेश नाईक यांनी दिलं.

नाईक विरुद्ध आव्हाड, नेमकं काय झालं? वाचा : “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना ते मंत्रिमंडळातही आले होते. समाजकारण आणि राजकारणात गती मिळावी म्हणून त्यांनी येस काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी पुन्हा एकदा सरकारचं नेतृत्व केलं. कालांतराने औरंगाबादमध्ये पुन्हा काँग्रेसचे दिवंगत पक्षाध्यक्ष राजीव गांधीच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परत पुढे 1999 साली स्वाभिमानाच्याच विचारांवर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली”, असं गणेश नाईक म्हणाले.

“आता माझं जितेंद्र आव्हाडांनासुद्धा सांगणं आहे की, शरद पवार यांनीदेखील तीन वेळा पक्ष बदलला आहे. मग शरद पवारांचीदेखील गणणा तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार आहात का? माझ्या मते, गरज म्हणून माणूस पक्ष बदलतो. अशा खालच्या स्तरावर टीका करणं योग्य नाही”, असंदेखील गणेश नाईक म्हणाले.

संबंधित बातमी : 

मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, आव्हाडांची गणेश नाईकांवर बोचरी टीका

मी राष्ट्रवादी सोडण्याचं कारण पवारांना माहित, त्यांनी सुनावलं तर गप्प बसेन : गणेश नाईक 

पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत : छगन भुजबळ

कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार

मिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…

नवी मुंबईत आता त्यांची ताकद राहिली नाही, रोहित पवारांचा गणेश नाईकांना टोला