कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार

कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार

कोरोनामुळे आपण हस्तांदोलन टाळत आहे. "तुम्हीही अशीच काळजी घ्या," असा सल्लाही अजित पवारांनी दिला (Ajit Pawar No Handshake) आहे.

Namrata Patil

|

Mar 08, 2020 | 4:07 PM

बारामती : कोरोनाबद्दल प्रत्येकजण जागरूक राहू लागला (Ajit Pawar No Handshake) आहे. याबाबत अधिकाअधिक काळजी घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. अशीच दक्षता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली आहे. अजित पवार यांनी आज (8 मार्च) वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. पण या कार्यक्रमाला त्यांनी प्रत्येक ठिकाणी हात जोडून नमस्कार केला. कोरोनामुळे आपण हस्तांदोलन टाळत आहे. “तुम्हीही अशीच काळजी घ्या,” असा सल्लाही अजित पवारांनी दिला आहे.

अजित पवार स्वच्छतेबाबत नेहमीच (Ajit Pawar No Handshake) आग्रही असतात. त्यामुळे त्यांच्या आगमनापूर्वी कार्यक्रमांचे आयोजक आपला परिसर टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र दक्षता घेतली जाते आहे.

आज बारामतीत विविध कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आले. मात्र त्यांनी यावेळी हस्तांदोलन करणं टाळलं. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या खास शैलीत याबद्दल स्पष्टीकरण दिलं. “लोकांना वाटेल मी उपमुख्यमंत्री झालो आहे. म्हणून बाबा हातात हात देईना. तर तसं काही नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळं आपण हातात हात देणं टाळत असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.”

या स्पष्टीकरणानंतर अजित पवार यांनी आपला मोर्चा डॉक्टरांकडे वळवला. “सध्या डॉक्टर मंडळीच सांगत आहेत की कोणाच्याही हातात हात देऊ नका, हस्तांदोलन करु नका आणि आता डॉक्टरच हस्तांदोलन देण्यासाठी आग्रह करतात. हे काही बरोबर नाही,” असेही ते म्हणाले.

प्रत्येकानं याबद्दल काळजी घेण्याची आवाहनही अजित पवारांनी केलं आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावर बोलतानाच अजित पवार यांनी प्रत्येक ठिकाणी भेटण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असल्याचं सांगितलं. “काहीजण हस्तांदोलन करतात, तर काहीजण गळाभेट घेतात. मात्र मोदी-ट्रम्प हे दोघेतर एकमेकांचा हातच सोडायला तयार नव्हते,” असा टोलाही अजित पवारांनी (Ajit Pawar No Handshake) लगावला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें