‘शब ए बारात’ला स्फोट घडवणाऱ्या साध्वीला तिकीट, मोदींना उभं करु नका : शरद पवार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ईशान्य मुंबईचे महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारार्थ गोवंडीच्या शिवाजी नगर सभा झाली. संध्याकाळी साडे पाच वाजता होणाऱ्या या प्रचारसभेला शरद पवार तब्बल 4 तास उशिराने सभा स्थळी आले. यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. विकासाच्या नावावर निवडणूक न लढवता वर्ध्या झालेल्या पहिल्या […]

शब ए बारातला स्फोट घडवणाऱ्या साध्वीला तिकीट, मोदींना उभं करु नका : शरद पवार
Follow us on

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ईशान्य मुंबईचे महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारार्थ गोवंडीच्या शिवाजी नगर सभा झाली. संध्याकाळी साडे पाच वाजता होणाऱ्या या प्रचारसभेला शरद पवार तब्बल 4 तास उशिराने सभा स्थळी आले. यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. विकासाच्या नावावर निवडणूक न लढवता वर्ध्या झालेल्या पहिल्या सभेत मोदींनी शेतकरी समस्या, बेरोजगारी, यावर न बोलता, त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचाराला सुरुवात केली, असं पवार म्हणाले.

हिंदुत्व आणून  राजकारण करण्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली. पहिल्या वेळेस लोकसभेत शपथ घेतो ती आपण सर्वांचे आहेत. पण मोदींनी हिंदुत्वासोबत असल्याची शपथ घेतली. त्यामुळे ते दुसऱ्या धर्माच्या नावावर  दुही निर्माण करत आहेत, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, असं पवार म्हणाले.

 मालेगाव बॉम्बस्फोट

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी मालेगाव स्फोटावरुन प्रज्ञासिंह ठाकूरवर निशाणा साधला. “मशिदीत जाऊन कोणी असं करणार नाही. कारण ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाला ती ‘शब ए बारात’ची रात्र होती. पोलिसांच्या चौकशीत साध्वीचं नाव आलं, त्यांना अटक केली. मात्र भाजपने साध्वीला सोडलं आणि निवडणुकीत तिकीटही दिलं. साध्वीने बाबरी मस्जिद पाडण्यात हात असल्याचं कबुल केलं. अशा लोकांसाठी मोदी मत मागत असतील तर त्यांना उभं करु नका”,  असं पवार म्हणाले.

माझे घर शेकापशी बांधील – शरद पवार

दरम्यान, शरद पवार यांची काल नवी मुंबईतील खारघरमध्येही जाहीर सभा झाली. मावळ मतदारसंघातून शरद पवार यांचा नातू पार्थ पवार निवडणूक लढवत आहे. त्याच्या जाहीर प्रचार सभेसाठी शरद पवार खारघर येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोदी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. “मोदी म्हणतात पवार किसके साथ बैठते  है, ,याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले  1936 मध्ये माझी आई जिल्हा परिषदेत शेकापमधून निवडून आली होती. माझे घर शेकाप  पक्षाशी बांधील आहे. मी त्यांच्यासोबत आहे”, असं पवारांनी नमूद केलं.