फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

| Updated on: Jul 11, 2020 | 9:57 AM

शरद पवार यांनी आघाडी सरकारमधील मतभेद ते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटासह अनेक प्रश्नांवर रोखठोक उत्तरं दिली (Sharad Pawar on Devendra Fadnavis).

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अडीच तास मॅरेथॉन मुलाखत घेतली. यात त्यांनी शरद पवार यांना आघाडी सरकारमधील मतभेद ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटासह अनेक प्रश्न विचारले. यावर शरद पवार यांनी रोखठोक उत्तरं दिली (Sharad Pawar on Devendra Fadnavis in Saamana interview). देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेबाबत केलेल्या दाव्यावर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काहीच माहिती नाही, असं मत व्यक्त करत टोला लगावला.

शरद पवार म्हणाले, “सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहित नाही.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“मी आघाडी सरकारचा हेड मास्टरही नाही आणि रिमोट कंट्रोल देखील नाही. हेडमास्टर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधीही चालत नाही. जिथं लोकशाही नाही तिथंच रिमोट चालतं. आपण रशियाचं उदाहरण पाहिलं तर तेथे पुतीन 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहणार आहेत. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सर्वकाही बाजूलाच केले आहे. त्यामुळे आपण म्हणू तसे सरकार चालवले पाहिजे हा अट्टाहास आहे. इथं लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार कधीही रिमोट कंट्रोलवर चालू शकत नाही. मला ते मान्य नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहे,” असंही शरद पवार म्हणाले.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पहिले दीड महिने मी घराच्या चौकचीबाहेरही गेलो नाही

शरद पवार यांनी आपल्या या मुलाखतीत लॉकडाऊनदरम्यानचे आपले अनुभव देखील सांगितले. ते म्हणाले, मी सुरुवातीचा महिना दीड महिना अक्षरशः माझ्या घराच्या चौकटी बाहेरही गेलो नाही. अगदी प्रांगणातही गेलो नाही. चौकटीच्या आतच होतो. एक तर घरातून दबाव होता. सर्व तज्ज्ञांनी 70 ते 80 वयोगटातील सर्वांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे आणि या गटातील सर्वांना जास्त धोका आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे काळजी घेण्याबाबत घरच्यांचा आग्रह होता. बराचसा वेळ टेलिव्हिजन, वाचन याच्याबाहेर काही दुसरं केलं नाही.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार व्हरांड्यात फेऱ्या मारत गीत रामायण ऐकत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात खूप गाणी ऐकली. भीमसेन जोशींचे सर्व अभंग ऐकले. हे अभंग दोन-तीन-चार नव्हे तर अनेकदा ऐकले. जुन्या काळात बिनाका गीतमाला असायची. आता ती नव्याने उपलब्ध आहे. त्याही पुन्हा पुन्हा ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळाली. संपूर्ण गीत रामायण पुन्हा ऐकलं. ग दि माडगुळकरांनी देशाच्या विशेषतः महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सांस्कृतिक विश्वात किती जबरदस्त कलाकृती निर्माण करु ठेवलीय याचा पुन्हा प्रत्यय घेतला.”

हेही वाचा :

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन चेष्टेचा विषय झाला, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोमणा

तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

Sharad Pawar on Devendra Fadnavis in Saamana interview