AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला आश्चर्य वाटतं की… फडणवीसांच्या ‘बालसाहित्य’ टीकेवरून शरद पवारांची टोलेबाजी!

खासदर संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. या प्रकाशन सोहळ्याला खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली.

मला आश्चर्य वाटतं की... फडणवीसांच्या 'बालसाहित्य' टीकेवरून शरद पवारांची टोलेबाजी!
sharad pawar
| Updated on: May 17, 2025 | 7:59 PM
Share

Sharad Pawar : खासदर संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. या प्रकाशन सोहळ्याला खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांनी या कार्यक्रमात भाषण करत सरकारच्या तसेच यंत्रणेच्या कामावर टीका केली. त्यांनी आपल्या या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

मला आश्चर्य वाटतं की…

“संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होत आहे. या पुस्तकावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी बालसाहित्य वाचत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया दिला. हाच संदर्भ घेत शरद पवार यांनी फडणीसांचे नाव न घेता टोला लगावला. संजय राऊत यांचं पुस्तक प्रसिद्ध होणार आहे, हे आपण गेल्या दोन दिवसांपासून ऐकत आहोत. मला आश्चर्य वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक न वाचता कसं समजलं? या पुस्तकावर प्रचंड टीका केली जात आहे. राऊतांवरही गेल्या दोन दिवसांपासून टीका केली जात आहे. कोणी सांगितलं की मी बालसाहित्य वाचत नाही. कोणी आणखी काही टीका केली,” असं शरद पवार म्हणाले.

अनिल देशमुकांवर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, पण…

सत्तेचा गैरवापर कसा होता हे राऊत यांच्या पुस्तकातून समजतं. तसं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ही यंत्रणा आहे ती कशी वागते याचं उत्तम लिखाण या पुस्तकात आहे. अनिल देशमुखांवर १०० कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोर्टात केस केली. त्यातला शंभरचा आकडा गेला. दोन शून्य गेली. एक कोटीचा आरोप केला, असं म्हणत सरकारने सूडभावनेतून ही कारवाई केली होती, असं शरद पवार म्हणाले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता