Sharad Pawar : शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत, राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं? इनसाईड स्टोरी

त्यासाठी नेत्यांनी तयार राहवं असेही पवारांनी या बैठकीत बजावलं आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीबाबतही या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली आहे.

Sharad Pawar : शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत, राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं? इनसाईड स्टोरी
शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 03, 2022 | 9:31 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shrad Pawar) यांनी आज मुंबईत महत्वपूर्ण बैठका घेतल्या आहेत. या बैठकीतून एक मोठी इनसाईन स्टोरी समोर आली आहे. शरद पवारांनी या बैठकीत मध्यावधी निवडणुकांचे संकेत (Mid Term Elections) दिले आहेत. त्यासाठी नेत्यांनी तयार राहवं असेही पवारांनी या बैठकीत बजावलं आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीबाबतही या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा (NCP) झाली आहे. डिसेंबरमध्ये ही मध्यावधी निवडणूक होण्याचे शरद पवारांनी संकेत दिलेत. शरद पवार यांनी हे संकेत देताना फक्त महाराष्ट्राचा उल्लेख केला नाही तर गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार असं भाकीत शरद पवारांनी वर्तवले आहे. त्यामुळे शरद पवारांचं हे भाकीत किती खरं ठरतं हे येणार डिसेंबरच सांगेल. मात्र सध्याचं राजकीय वातावरण पाहता शरद पवारांचं हे भाकीत आता चांगलेच चर्चेत आलेले आहे.

महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार?

शरद पवारांनी हे संकेत दिले असल्याने आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय तो म्हणजे, महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार? कारण शरद पवारांच्या वाक्याचा अर्थ तर थेट असाच होतो. दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे सरकार आलंय. मात्र दोन दिवसात मध्यावधी निवडणुकांचीही चर्चा सुरू झाल्याने आता सत्ताधाऱ्यांनाही सावध राहण्याचे हे संकेत असणार आहेत. गेल्या अडीच वर्षात हे सरकार पडेल असे दावे भाजपकडून करण्यात आले. भाजपचं हे भाकीत खरं ठरायला अडीच वर्षे जरी लागली असली तरी शेवटी दावे खरे ठरले आहेत. त्यामुळे आंतरविरोधाने भाजप आणि शिंदे यांचं सरकार पडेल असेच भाजपच्या विधानांसारखं विधान आता पवारांनी केलं आहे.

पवारांच्या विधानाचा संदर्भ काय?

गेल्या एक महिना आधी महाविकास आघाडी सरकार पडेल अशी भनकही कुणाला लागली नव्हती. मात्र एका महिन्यात राज्याचं राजकारण या टोकाने त्या टोकाला जात ठाकरे सरकार गेलं आणि राज्यात शिंदे भाजप आघाडीचं सरकार आलंं. पवारांच्या वाक्याचा नीट अर्थ समजून घेतल्या. पवारांच्या डोक्यात भाजप शिवसेनेचे युतीतील वाद, युती तुटण्याची कारणं, महाविकास आघाडी स्थापन होण्याची समीकरण, तसेच आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो असे सरकारमध्ये बसून शिवसेना नेत्यांची वक्तव्य करणं आणि त्यानंतर भाजप शिवसेनेचा काडीमोड होणं हे सर्व अनेक राजकीय पंडितांना आठवायला लागलं आहे. भाजपच्या तारखा खऱ्या ठरल्या नाहीत तसं भाकीत खरं ठरलं. मात्र आता पवारांच्या विधानबाबतही सेम स्टोरी पहायाल मिळणार की वेगळी समीकरणं तयार होणार हे येणारा डिसेंबरच सांगेल.