AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena MP : शिवसेनेचे चार खासदार फडणवीसांना भेटले, सुत्रांची माहिती, शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का?

आता भाजपसोबत जाण्याची वेळ आली आहे, अशी मागणी या खासदारांची आहे. त्यामुळे राज्यात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Shivsena MP : शिवसेनेचे चार खासदार फडणवीसांना भेटले, सुत्रांची माहिती, शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का?
उद्धव ठाकरे आणि शिंदे-फडणवीसImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 03, 2022 | 8:29 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेनेला (Shivsena) सर्वात मोठा झटका बसला आहे. असाच आता आणखी एक मोठा झटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे चार खासदार (Shivsena MP) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. आता भाजपसोबत जाण्याची वेळ आली आहे, अशी मागणी या खासदारांची आहे. त्यामुळे राज्यात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यापासून शिवसेनेतली गळती थांबत नाहीये. गेल्या अनेक दिवसात अनेक नेत्यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. एकापाठोपाठ एक नेते हे एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी आमदारांना गुवाहाटीत घेऊन थांबले होते त्या ठिकाणी पोहोचले. तर आधीपासून काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ होते. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांनी कोणत्याही बैठकांना हजेरी लावली नव्हती. आता शिवसेनेतली हीच गळती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टीव्ही 9 ला विश्वसनीय सुत्रांची माहिती

कोणते खासदार संपर्कात नव्हते?

या बंडाच्या पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे हे ठाकरेंच्या संपर्कात नव्हते. एवढच नाही तर भावना गवळी याही शिवसेनेच्या कोणत्याही बैठकीला दिसून आल्या नाहीत. मात्र इतर खासदार हे सर्व शिवसेनेच्या सर्व बैठकांना उपस्थित होते.

कुणीही फुटणार नाही, शिवसेना नेत्याचा दावा

तर एक गट गेला म्हणून पक्ष जात नाही. त्यामुळे आत्ता कुणीही फुटणार नाही. आम्ही पुन्हा शिवसेनेला जोमाने उभं करण्यासाठी सज्ज आहोत. शिवसेनेची साथ आम्ही कधीच सोडणार नाही, अशा प्रतिक्रिया गेल्या काही दिवसात झालेल्या बैठकांनंतर शिवसेनेचे खासदार देत होते. मात्र दुसरीकडे अनेक खासदार हे एकानाथ शिंदे आणि भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात होत्याच. त्यामुळे आता फडणवीसांच्या या भेटीने हा सस्पेन्स आणखी वाढला आहे. फडणवीसांच्या भेटीत चर्चा काय झाली हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. मात्र लवकरच ही बाजुही बाहेर येण्याची शक्यता आहे. आता या खासदारांच्या मागणीने शिवसेनेचं टेन्शन मात्र नक्कीच आणखी वाढलं आहे.

Follow Us
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद