Sharad Pawar : ‘अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं तेच तुमचा आमदार करतोय’ चौंडीत शरद पवारांकडून रोहित पवारांवर कौतुकाचा वर्षाव

| Updated on: May 31, 2022 | 7:25 PM

अहिल्यादेवी होळकरांचे स्मरण करताना इथे उद्योग आणण्यासाठी रोहित प्रयत्न करतोय. पुढील काळात मोठा रोजगार येईल. रस्ते असो, पाणी असो, रोजगार असतो, अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं ते तुमचा आमदार करतोय, अशा शब्दात पवार यांनी नातू रोहित पवारांचं कौतुक केलं.

Sharad Pawar : अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं तेच तुमचा आमदार करतोय चौंडीत शरद पवारांकडून रोहित पवारांवर कौतुकाचा वर्षाव
शरद पवार, रोहित पवार
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी रोहित पवारांचं (Rohit Pawar) तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. ‘आज अहिल्यादेवी होळकरांचे स्मरण करताना इथे उद्योग आणण्यासाठी रोहित प्रयत्न करतोय. पुढील काळात मोठा रोजगार येईल. रस्ते असो, पाणी असो, रोजगार असतो, अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं ते तुमचा आमदार करतोय’ अशा शब्दात पवार यांनी नातू रोहित पवारांचं कौतुक केलं.

शरद पवार म्हणाले की, ‘उभ्या आयुष्यात जे कर्तृत्व अहिल्यादेवी होळकरांनी दाखवलं ते आजत्या कार्यक्रमातून पुढे जात आहे. देशात तीन महिलांची नावं घेतली जातात. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर. सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रशासन कसे चालवावे हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी सर्व जाती-धर्मासाठी काम केले. जिजामाता, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी या सर्वांचे काम वेगवेगळे होते. आजचा दिवस स्त्रियांचा सन्मान करण्याचा आहे’.

हे सुद्धा वाचा

‘मला आनंद आहे की तुम्ही रोहितला निवडून दिले’

‘एकेकाळी या भागात मोठा दुष्काळ होता. आजपर्यंत प्रश्न सुटले नाहीत. मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही रोहितला निवडून दिले. दोन वर्षही झाली नाहीत मात्र त्याचं काम दिसून येत आहे. इथला पाण्याचा प्रश्न मोठा आहे. रोहितने जबाबदारी घेतल्यावर अनेक मंत्र्यांनी पाणी प्रश्नाबाबत इथे बैठक घेतली. मला विश्वास आहे की पुढील काळात पाणी येईल. आज अहिल्यादेवी होळकरांचे स्मरण करताना इथे उद्योग आणण्यासाठी रोहित प्रयत्न करतोय. पुढील काळात मोठा रोजगार येईल. रस्ते असो, पाणी असो, रोजगार असतो, अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं ते तुमचा आमदार करतोय’, असंही पवार यावेळी म्हणाले.

रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सवादरम्यान माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर जहरी टिका केली. या टिकेला आमदार रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्त्युत्तर दिलय. काहीजण केवळ खालच्या दर्जाचं बोलण्यात धन्यता मानतात, त्यांच्या बोलण्याला फार महत्व देत नाही. तसंच पडळकर खूप चांगली अँटिंग करतात, तसा व्यक्तिगत स्टंट पडळकरांनी केला. पडळकरांचे भाषण हे 3rd ग्रेडचे भाषण होतं. आम्हाला मातीत घालायचं की नाही ते लोकं ठरवतील, असा टोलाही त्यांनी लगावलाय.