Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे गोडेपाणी खारटच राहणार?; शिंदे सरकार आदित्य यांचे पाच प्रकल्प रोखणार?

| Updated on: Jul 10, 2022 | 11:46 AM

Aaditya Thackeray : समुद्राचे खारे पाणी गोड करणे, 23 हजार 447 कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प, माहुल पंपिंग स्टेशनसाठी अदलाबदल केलेला भूखंड आणि वरळीतील काही प्रकल्प आदी प्रकल्प आदित्य ठाकरेंचे आहेत.

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे गोडेपाणी खारटच राहणार?; शिंदे सरकार आदित्य यांचे पाच प्रकल्प रोखणार?
आ. आदित्य ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यात सरकार येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारने (thackeray government) घेतलेल्या निर्णयांचा फेर आढावा घेतला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यातील काही निर्णय रद्द करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. या शिवाय फडणवीस यांनी जलयुक्त शिवार प्रकल्प राबवणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच आरेतच मेट्रोचे कारशेड करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांचे पाच ड्रीम प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकार रोखणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात गोराईतील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे आदित्य यांच्या मतदारंघातीलही प्रकल्प रोखण्यात येणार असल्याने आदित्य यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

समुद्राचे खारे पाणी गोड करणे, 23 हजार 447 कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प, माहुल पंपिंग स्टेशनसाठी अदलाबदल केलेला भूखंड आणि वरळीतील काही प्रकल्प आदी प्रकल्प आदित्य ठाकरेंचे आहेत. आदित्य यांचे हे ड्रीम प्रकल्प असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे प्रकल्प आता बंद करण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

युवराजांसाठी कायपण

माहुल पंपिंग स्टेशनसाठी आणिख येथील भूखंड बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता. आदित्य ठाकरे यांच्या अट्टाहासापायीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. आदित्य यांच्यासाठी प्रशासनाने आपलं धोरणंही बदललं. भूखंडाच्या बदल्यात पैसे हे धोरण प्रशासनाने स्वीकारलं. त्यामुळे प्रशासनाचा हा निर्णय रद्द केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्रालाही ब्रेक

त्याशिवाय वरळी, धारावी, वांद्रे, घाटकोपर, भांडूप आणि वर्सोवा येथील मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 16 हजार 412 कोटी खर्चाची निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, कंत्राटदाराने 30 ते 60 टक्के दराने निविदा भरली. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत 23 हजार 447 कोटीवर गेल्याने हा प्रकल्पही बासनात गुंडाळला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

खारे पाणी खारेच राहणार

गोराई येथे खारे पाणी गोड करण्याचा प्रकल्प राबवण्यात येणार होता. या प्रकल्पासाठी 3 हजार 520 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होता. म्हणजे प्रति लिटर हजार गोडपाण्यासाठी 160 ते 170 रुपये खर्च येणार होता. त्याला भाजपने सुरुवातीपासूनच विरोध केला होता. आता सत्ता आल्याने या प्रकल्पाला ब्रेक लावणार जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.