AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Tweet : …जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते, शिवसेना नेते संजय राऊतांची एकनाथ शिंदे गटावर टीका, अस्वलाचा व्हिडीओ केला ट्विट

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Sanjay Raut Tweet : ...जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते, शिवसेना नेते संजय राऊतांची एकनाथ शिंदे गटावर टीका, अस्वलाचा व्हिडीओ केला ट्विट
मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 10, 2022 | 11:37 AM
Share

मुंबई : ‘…जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते,’ असं लिहित शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) अस्वलाचा व्हिडीओ ट्विट (Tweet) करत एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेना विरुद्ध शिंदे गट, असा संघर्ष निर्माण झालाय. यातच वारंवार शिवसेना नेते संजय राऊत हे एकनाथ शिंदे गटावर टीका करतान दिसत आहे. राऊत त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून बंडखोर गटावर सडकून टीका करताना दिसतात. यातच आता संजय राऊत यांनी एक अस्वलाचा व्हिडीओ ट्विट करत शिंदे गटाला लक्ष्य केलंय. यामध्ये त्यांनी ‘…जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते,’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या गटाला लक्ष्य केलंय. यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

संजय राऊतांचे ट्विट

सकाळी राऊतांचे दोन ट्विट

यापूर्वी देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये राऊत यांनी विठ्ठलाचा आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्विट केला. त्यामध्ये विठ्ठल विठ्ठल, असाही उल्लेख संजय राऊत यांनी केलाय.

संजय राऊतांचे ट्विट

राऊतांच्या विधानाची खिल्ली

यापूर्वी देखील शिवसेना नेते यांनी 50 खोके पचणार नाही, असा उल्लेख केला होता. यावरुन राऊत यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं. त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली होती.

शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष वाढणार?

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. शिवसेना नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची  वारंवार बंडखोर आमदारांवर होत असलेली टीक आणि त्यातून दोन्ही बाजूकडून वाढत असलेला वाद, यावरुन संघर्ष अधिकच वाढण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, बंडखोर आमदारांचं प्रकरण कोर्टात गेलं असून आता निकालानंतर राज्यात काय बदल बघायला मिळतो, कोर्टाचा निकाल काय येतो, याकडे देखील लक्ष असणार आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन