Shivsena Symbol : शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’; चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

अखेर निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शिंदे गट ढाल-तलवार घेऊन लढणार आहे. तर, उद्धव ठाकरे गटाला मशाल मिळाली आहे.

Shivsena Symbol : शिंदे गटाला मिळाली ढाल-तलवार; चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
| Updated on: Oct 11, 2022 | 6:09 PM

संदीप राजगोळकर, tv9 नवी दिल्ली :  एकनाथ शिंदे गट शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिंदे गटाला निवडणुक चिन्ह देण्याबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.  शिंदे गटाला (Eknath Shinde) निवडणुक आयोगाने ढाल-तलावर हे चिन्ह दिले आहे.  निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे चिन्हाचा वाद तात्पुरता मिटला आहे.  सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे.

शिंदे गटाने कोणते पर्याय दिले होते?

निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली होती.

तर, दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे.

शिंदे गटाच्या नविन नावासह चिन्ह देखील जाहीर झाले

शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालं आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची हे पर्याय ठेवले होते त्यातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’, हे नाव शिंदे गटाला मिळालं आहे.

ठाकरे गटाचे नाव आणि चिन्ह काय?

उद्धव ठाकरे यांच्या गटाने तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर मांडले होते. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल. या तिन्ही पैकी मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळाल आहे.

ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे असे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवले होते. त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ठाकरे गटाला मिळालं आहे.