Maharashtra politics : राजकीय वगनाट्यात केंद्राचे डफली, तुणतुणेवाले उतरले; नाचे आमदार त्यांच्या तालावर नाचू लागले, शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

| Updated on: Jun 27, 2022 | 7:59 AM

बंडखोर आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आल्याने सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाच या सर्व प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे.

Maharashtra politics : राजकीय वगनाट्यात केंद्राचे डफली, तुणतुणेवाले उतरले; नाचे आमदार त्यांच्या तालावर नाचू लागले, शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल
संजय राऊत
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra politics) राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) 40 पेक्षा अधिक आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याने 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारच्या वतीने वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आता यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयधून टीका करण्यात आली आहे. ‘अखेर गुवाहाटी प्रकरणात भाजपाचे (BJP) धोतर सुटले आहे. शिवसेना आमदारांचे बंड हा त्यांचा अंतर्गत मामला आहे, असे हे लोक दिवसाढववळ्या सांगत होते. पण बडोद्यात म्हणे श्रीमंत देवेंद्र फडणवीस आणि अतिश्रीमंत एकनाथ शिंदे यांची काळोखात गुप्त भेट झाली. त्या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील सामील होते. त्यानंतर लगेचच 15 बंडखोरांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय केंद्राने घेतला. हे आमदार जणू लोकशाहीचे रखवालेच आहेत, त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागू नये असे केंद्राला वाटते काय? असा सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे’.

50 कोटींमध्ये विकले गेले

संपादकीयमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘खरं तर हे लोक 50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल किंवा बिग बुल आहेत. लोकशाहीला लागलेला हा कलंकच आहे. तो कलंक सुरक्षित ठेवण्यासाठी काय हा आटापिटा? या आमदारांना मुंबईत येण्याची भीती वाटते की,  आपल्या कैदेत असलेले आमदार मुंबईत दाखल होताच पुन्हा उड्या मारून स्वगृही दाखल होतील अशी भीती केंद्र सरकारला वाटते? त्यामुळेच त्यांना सरकारी ‘केंद्रीय’ सुरक्षा यंत्रणेचे बंदी करण्यात आले’. असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाच सूत्रधार

एक मात्र नक्की की, महाराष्ट्राच्या राजकीय वगनाट्यात केंद्रांचे डफली, तुणतुणेवाले उतरले असून, राज्यातील ‘नाचे’ आमदार त्यांच्या तालावर नाचत आहेत. हे आमदार आपल्या महाराष्ट्रद्रोहाचे प्रदर्श संपूर्ण देशाला आणि जगाला करीत आहेत. आता या ‘वग’नाट्याचे सूत्रधार आणि दिग्दर्शक नेमके कोण आहेत, हे उघड झाले आहेत, केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजपाचीच या नाच्यांना फूस आहे. त्यांच्या तमाशाचा फड त्यांनीच रंगवला आणि सजावला आहे. कथा-पटकथाही भाजपानेच लिहिल्याचे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.