सेनेची मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये जाणार? खोतकर पहिल्यांदाच बोलले…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नाशिक : जालन्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करुन, आगामी लोकसभा निवडणुका लढतील, अशा चर्चा सुरु असताना, पहिल्यांदाच अर्जुन खोतकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्यांमध्ये काहीही अर्थ नाही, असे अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे. अर्जुन खोतकर काय म्हणले? “काँग्रेसमध्ये जाण्याचा बातम्यामध्ये काही अर्थ नाही. मी कुणालाही भेटलो […]

सेनेची मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये जाणार? खोतकर पहिल्यांदाच बोलले...
Follow us on

नाशिक : जालन्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करुन, आगामी लोकसभा निवडणुका लढतील, अशा चर्चा सुरु असताना, पहिल्यांदाच अर्जुन खोतकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसमध्ये जाण्याच्या बातम्यांमध्ये काहीही अर्थ नाही, असे अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.

अर्जुन खोतकर काय म्हणले?

“काँग्रेसमध्ये जाण्याचा बातम्यामध्ये काही अर्थ नाही. मी कुणालाही भेटलो नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी अंतिम निर्णय घेणार आहे. ठाकरे घराण्याशी मी गद्दारी करणार नाही. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो अंतिम राहील.”, असे अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना नाहीतर काँग्रेसकडून, अर्जुन खोतकर दानवेंना भिडणारच?

नेमकं प्रकरण काय आहे?

जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच अर्जुन खोतकर यांना पक्षात घेण्सासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. नुसती चाचपणीच नव्हे, तर जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्जुन खोतकर यांनाच उमेदवारी देण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, खोतकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची गेल्या काही दिवसात दोनदा भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यातच महिन्या-दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा आपणच पराभव करणार असल्याचे सांगत आहेत. किंबहुना, आपणच दानवेंविरोधात लाढणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे खोतकरांच्या बोलण्याला महत्त्व आले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली आणि अर्जुन खोतकरांना घोषणांना धक्का बसला. मात्र, तरीही अर्जुन खोतकर मागे हटण्यास तयार नाहीत. दानवेंविरोधात लढण्यासाठी त्यांना शड्डू ठोकला आहे.