Sanjay Raut Tweet : …जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते, शिवसेना नेते संजय राऊतांची एकनाथ शिंदे गटावर टीका, अस्वलाचा व्हिडीओ केला ट्विट
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मुंबई : ‘…जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते,’ असं लिहित शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) अस्वलाचा व्हिडीओ ट्विट (Tweet) करत एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेना विरुद्ध शिंदे गट, असा संघर्ष निर्माण झालाय. यातच वारंवार शिवसेना नेते संजय राऊत हे एकनाथ शिंदे गटावर टीका करतान दिसत आहे. राऊत त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून बंडखोर गटावर सडकून टीका करताना दिसतात. यातच आता संजय राऊत यांनी एक अस्वलाचा व्हिडीओ ट्विट करत शिंदे गटाला लक्ष्य केलंय. यामध्ये त्यांनी ‘…जेंव्हा स्वतःला आरशात पाहताना भीती आणि लाज वाटते,’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या गटाला लक्ष्य केलंय. यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.
संजय राऊतांचे ट्विट
सकाळी राऊतांचे दोन ट्विट
यापूर्वी देखील शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये राऊत यांनी विठ्ठलाचा आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्विट केला. त्यामध्ये विठ्ठल विठ्ठल, असाही उल्लेख संजय राऊत यांनी केलाय.
संजय राऊतांचे ट्विट
राऊतांच्या विधानाची खिल्ली
यापूर्वी देखील शिवसेना नेते यांनी 50 खोके पचणार नाही, असा उल्लेख केला होता. यावरुन राऊत यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं. त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली होती.
शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष वाढणार?
एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. शिवसेना नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची वारंवार बंडखोर आमदारांवर होत असलेली टीक आणि त्यातून दोन्ही बाजूकडून वाढत असलेला वाद, यावरुन संघर्ष अधिकच वाढण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, बंडखोर आमदारांचं प्रकरण कोर्टात गेलं असून आता निकालानंतर राज्यात काय बदल बघायला मिळतो, कोर्टाचा निकाल काय येतो, याकडे देखील लक्ष असणार आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.