मी मंत्रिपदासाठी उत्सुक नव्हतो : संजय राऊत

| Updated on: May 30, 2019 | 10:42 AM

नवी दिल्ली :  मी मंत्रिपदासाठी उत्सुक नव्हतो. माझा स्वभावदोष आहे. कुणापुढे हात बांधून उभा राहत नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट असते, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. मोदी सरकारचा ग्रॅण्ड शपथविधी सोहळा आज होत आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यात कुणाला संधी मिळणार याबाबतची उत्सुकता होती. त्याबाबतची संजय राऊत यांनी […]

मी मंत्रिपदासाठी उत्सुक नव्हतो : संजय राऊत
Follow us on

नवी दिल्ली :  मी मंत्रिपदासाठी उत्सुक नव्हतो. माझा स्वभावदोष आहे. कुणापुढे हात बांधून उभा राहत नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट असते, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. मोदी सरकारचा ग्रॅण्ड शपथविधी सोहळा आज होत आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यात कुणाला संधी मिळणार याबाबतची उत्सुकता होती. त्याबाबतची संजय राऊत यांनी माहिती दिली.

शिवसेनेकडून अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी ही माहिती खरी आहे. शिवसेना कोणत्याही खात्याचे सोने करेल. जसं मागे शिवसेनेकडे अवजड उद्योग खातं होते. उद्धवजी आणि अमित शाह यांच्यात बोलणे होईल. आमचा मंत्री शपथ घेईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मी मंत्रिपदासाठी उत्सुक नव्हतो. माझा स्वभाव दोष आहे. कुणापुढे हात बांधून उभा राहत नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट असते. मी कोणत्याही परिस्थितीत लिखाण स्वातंत्र्य गमावणार नाही. मी माझ्या पक्षाला बांधील आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

युवा कल्याण, श्रम, उद्योग ही खाती देशाच्या योगदानात तितकीच महत्वाची आहे.  शिवसेनेला या चार मंत्रिपदांपैकी मंत्रिपद मिळणे कठीण आहे. पंतप्रधान त्यांच्या विश्वासातील व्यक्ती नेमतात, ज्यांची या खात्यावर पकड असते, असं संजय राऊत म्हणाले. लोकसभा निकालाबाबत मोदी- शाह यांनी जे करुन दाखवले त्याला जगात तोड नाही, असं ते म्हणाले.

काँग्रेसवर प्रतिक्रिया

काँग्रेस प्रवक्त्यांबाबतची भूमिका योग्य आहे. दिल्ली आणि देशातील वारे एकादिशेने सुरु आहेत. अलीकडे मीडियात आपल्या विचारांचा नाही त्याला झोडपून काढले जाते. काही अपरिपक्व नेते आपल्या विधानांनी वाद निर्माण करतात.  प्रत्येक विषयावर मत व्यक्त करणे गरजेचे नसते. काही वेळेला मौन योग्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.

‘ममता बॅनर्जी स्वत:साठी खड्डा खणत आहेत’

पश्चिम बंगालमधील हिंसाचार योग्य नव्हता. भाजपच्या विजयामुळे ममता बनर्जी दुखावल्या आहेत. पण पंतप्रधानांच्या शपथविधीला हजेरी लावणे गरजेचे. पश्चिम बंगाल हा हिंदुस्थानचा भाग आहे. पंतप्रधानांना शुभेच्छा देणे हे प्रत्येक राज्याचे कर्तव्य. ममता ज्या पद्धतीने वागत आहेत ते पाहात त्या स्वतः साठी खड्डा खणत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.