Sanjay Raut : ‘मी नारायण राणेंना मानतो’ संजय राऊतांनी असं नेमकं का म्हटलं? किस्सा इंटरेस्टिंगय!

Eknath Shinde vs Shiv sena Live : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा केला आहे

Sanjay Raut : 'मी नारायण राणेंना मानतो' संजय राऊतांनी असं नेमकं का म्हटलं? किस्सा इंटरेस्टिंगय!
संजय राऊत आणि नारायण राणे
Image Credit source: TV9 Marathi
विनायक डावरुंग

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 26, 2022 | 10:23 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मी नारायण राणेंना मानतो, असं ते म्हणालेत. नारायण राणेंनी (Narayan Rane) बंड करण्याआधी राजीनामा दिला होता, असं ते म्हणालेत. त्यासाठी त्यांना मानतो, असं वक्तव्य राऊतांनी केलं. राणेंचा दाखला देत राऊतांनी शिंदे (Eknath Shinde News) गटाला आव्हान दिलंय. जेवढेपण आमदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरं जावं, असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आमदारांशी आपला संपर्क झालेला असल्याचा दावादेखील केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राजकीय संकटात महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभं आहे आणि उभं राहिलं, असा विश्वासही त्यांनी यावेळेला व्यक्त केला. खरंतर शरद पवारांना धमकावल्यावरुन संजय राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी राणेंच्या बंडाचा दाखला शिंदे गटाला दिलाय.

आमदार परततील, राऊतांना विश्वास

पत्रकारांशी बातचीत करण्याआधी आपली गुवाहाटीमध्ये असलेल्या काही आमदारांशी फोनवरुन बातचीत झाल्याचा दावा राऊतांनी केला. अनेक आमदारांना मुंबई परतण्याची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. परतणाऱ्या आमदारांना घराची दारं, खिडक्या आणि पडसे हे देखील उघडे असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. जबरदस्तीनं काही आमदारांना घेऊन जाण्यात आलं, याचा त्यांनी पुनरुच्चार केलाय.

‘द्या राजीनामे आणि लढून दाखवा’

आपआपल्या मतदारसंघात तरी तुम्ही निवडून येऊ शकता का? असा सवाल राऊतांनी विचारलाय. राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा, असंही त्यांनी म्हटलंय.य बाळासाहेबांचे भक्त पाठीत खंजीर खूपसत नाहीत, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला. बंडखोर आमदारांना कधी ना कधी मुंबईत यावंच लागणार आहे, असंही ते म्हणालेत.

न्यायलयीन लढा

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा केला आहे. तर 16 आमदारांना निलंबनाच्या नोटीसीला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या नोटिसीला आता शिंदे गटाकडून कोर्टाद्वारे उत्तर देण्यात येणार असल्याचं कळतंय. दुसरीकडे आजही मुंबईसह गुवाहाटीतही राजकीय बैठकांचा जोर पाहायला मिळतोय.

हे सुद्धा वाचा

वाचा एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें