शिवसेनेनं युती धर्म पाळला नाही, भाजप नेते प्रमोद जठार यांचा आरोप

| Updated on: Oct 05, 2019 | 2:28 PM

शिवसेनेने युती धर्म पाळला नसल्याने सिंधुदुर्गात युती तुटल्याचे संकेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी (Shivsena Bjp Alliance break) दिले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत प्रमोद जठार यांनी युतीबाबतचे संकेत दिले आहेत.

शिवसेनेनं युती धर्म पाळला नाही, भाजप नेते प्रमोद जठार यांचा आरोप
Follow us on

सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघात युतीतर्फे भाजपकडून नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे सतीश सावंत यांना उमेदवारी देण्यात (Shivsena Bjp Alliance break) आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात युतीवरील सावट (Shivsena Bjp Alliance break) कायम आहे. शिवसेनेने युती धर्म पाळला नसल्याने सिंधुदुर्गात युती तुटल्याचे संकेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांनी (Shivsena Bjp Alliance break) दिले आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत प्रमोद जठार यांनी युतीबाबतचे संकेत दिले आहेत.

आमचा उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा शिवसेनेला काय अधिकार? हा तर शिवसेनेचा वैचारिक बलात्कार आहे. आमच्या प्रदेश नेतृत्वाला आणि केंद्रीय नेतृत्वाला शिवसेनेने चॅलेंज दिल आहे. येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत शिवसेनेने अर्ज मागे घ्यावा. अन्यथा युद्ध अटळ आहे, अशा शब्दात प्रमोद जठार यानी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“सिंधुदुर्गात भाजपने युती धर्माचे पालन केले आहे. शिवसेनेने मात्र युती धर्म पाळला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील युती तुटल्याचे जठारांनी संकेत दिले. स्वाभिमान विलिनीकरण आणि नितेश राणे उमेदवारी हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचा आहे.” असेही जठार म्हणाले आहेत.

कणकवली मतदारसंघातून भाजपने अखेर नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे राणे यांचे खंदे समर्थक सतीश सावंत यांनी शिवसेनेच्या वतीने मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत (Shivsena Bjp Alliance break) रंगतदार होणार आहे.

जठार यांनी नितेश राणेंना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. “गेले 40 वर्ष शिवसेना नेते म्हणून काम करणाऱ्या नेत्याच्या मुलाला उमेदवारी देऊन आम्ही बाळासाहेब आणि शिवसेनेचा सन्मान राखला आहे,” अशा कानपिचक्याही दिल्या आहेत. तसेच दुसरीकडे शिवसेनेने सतीश सावंत यांना एबी फॉर्म दिल्याने भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. “युतीच काम करण्याची मानसिकता दोन्ही पक्षाची नाही” हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही पक्ष आमने सामने ठाकणार यात शंका नाही.