निलेश राणेंविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार, गुलाबराव पाटलांवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक

| Updated on: Nov 07, 2021 | 9:10 PM

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केलं होतं. त्या ट्वीटमध्ये निलेश राणेंनी शिवराळ भाषेचा वापर केलाय. त्याविरोधात आता जळगावमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. निलेश राणे यांच्याविरोधात मुक्ताईनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भाई यांनीही ही तक्रार दाखल केलीय.

निलेश राणेंविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार, गुलाबराव पाटलांवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक
निलेश राणे, गुलाबराव पाटील
Follow us on

मुक्ताईनगर : शिवसेना नेते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये एका कार्यक्रमात कव्वाली सादर केलं होती. याच मुद्द्यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केलं होतं. त्या ट्वीटमध्ये निलेश राणेंनी शिवराळ भाषेचा वापर केलाय. त्याविरोधात आता जळगावमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. निलेश राणे यांच्याविरोधात मुक्ताईनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भाई यांनीही ही तक्रार दाखल केलीय. (Shivsena files case against Nilesh Rane at Muktainagar police station)

गुलाबराव पाटील यांनी नशिराबादमधील एका कार्यक्रमात कव्वाली सादर केली होती. त्यावर निलेश राणे यांनी ट्विट करुन गुलाबराव पाटलांवर जोरदार टीका केली होती. त्या ट्विटमध्ये त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला होता. निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यानंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश राणेंच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ आणि निलेश राणेंच्या कृत्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिक राणेंचा पुतळा जाळणार असल्याचेही शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय.

निलेश राणेंचे ट्विट काय?

निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांवर जोरदार निशाणा साधला होता. ‘सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी, असं सगळं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि MIM पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे’, असं ट्वीट निलेश राणेंनी केलं होतं.

गुलाबराव पाटील काहीही बोलले तर चालतं का?

त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी काहीही बोललं तर चालतं का? त्यांच्यावर बोललो तर काय चुकलं? ते वापरतात ती भाषा चालते का? मी जळगावात जाहीर सभा घेईल आणि अजून बोलेन. त्यांच्या जिभेला काही हाड आहे का? ते विसरले आहेत की ते मंत्री आहेत. एका मंत्र्याची अशा प्रकारची भाषा असते का? ते सुधारले नाहीत तर मी ही सुधारणार नाही, असं निलेश राणे टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.

इतर बातम्या :

‘महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु, महाविकास आघाडी भलत्याच कामात व्यस्त’, राजू शेट्टींचा टोला

Aryan Khan : आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांनी SIT समोर नोंदवला जबाब; पुढील कारवाई काय?

Shivsena files case against Nilesh Rane at Muktainagar police station