अनिल परब यांची मंत्रिपदी वर्णी, वाढदिवसापूर्वी ‘मातोश्री’चं अनोखं गिफ्ट

| Updated on: Dec 30, 2019 | 9:26 AM

वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी मला आशिर्वाद दिले आहेत." अशी भावनिक प्रतिक्रिया अनिल परब यांनी (Anil Parab Shivsena Minister List) दिली.

अनिल परब यांची मंत्रिपदी वर्णी, वाढदिवसापूर्वी मातोश्रीचं अनोखं गिफ्ट
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली (Anil Parab Shivsena Minister List) आहे. अॅड अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह 13 जण मंत्रिपदाची शपथ (Anil Parab Shivsena Minister List) घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शपथविधीपूर्वी शिवसेना आमदार अॅड अनिल परब यांना मंत्रिमंडळात समावेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, “माझा उद्या (30 डिसेंबर) वाढदिवस आहे. पण त्यापूर्वीच एक दिवस अगोदरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला आशिर्वाद दिले आहेत.”

“अॅड अनिल परब यांचा उद्या (30 डिसेंबर) वाढदिवस आहे. मात्र त्यापूर्वीच मला मातोश्रीने हे अनोखं गिफ्ट दिलं आहे. दरवर्षी मला वाढदिवशी मातोश्री आशिर्वाद देते. पूर्वीपासून मी सकाळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद घेतो. पण त्यापूर्वीच वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी मला आशिर्वाद दिले आहेत.” अशी भावनिक प्रतिक्रिया अनिल परब यांनी (Anil Parab Shivsena Minister List) दिली.

“महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागली आहे असा मला काल (28 डिसेंबर) निरोप आला. मंत्रिपदी वर्णी लागणं ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सकाळी मला याबाबतची माहिती मिळाली. पक्षातील प्रमुख नेत्यांनी हे कळवलं. असे अनिल परब म्हणाले.”

“पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे शिवसेनेत नक्कीच चीज होतं हा माझा प्रामाणिक अनुभव आहे. हा माझाच नाही, तर कित्येक सर्वसामान्य शिवसैनिकांचा हा अनुभव आहे. कित्येक साध्या साध्या घरातील कित्येक मुलं ज्यांनी पक्षासाठी निष्ठेतेन काम केले. त्यांच्या निष्ठेचे चीज पक्षाने नेहमीच केलं आहे. असेही परब यावेळी म्हणाले.”

“शपथविधीबाबत अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही बोलण झालेले नाही. ते सध्या दौऱ्यावर आहेत. ते आल्यानंतर माझं त्यांच्याशी बोलणं होईल, असेही अनिल परब यांनी यावेळी (Anil Parab Shivsena Minister List) सांगितले.”

“मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर कुटुंब खुश आहे. तसा कुटुंबाकडे देण्यासाठी फार वेळ नसतो. अशा महत्त्वाच्या क्षणी कुटुंब माझ्यासोबत आहे. असेही ते म्हणाले.”

“मी शिवसेनाचा एक प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्ता आहे. शिवसेना हा सैनिक पक्ष आहेत. या पक्षात हाच आदेश हाच प्रमाण मानला जातो. त्यामुळे आम्ही कुठलीही अपेक्षा ठेवून काम केले नाही. जी जबाबदारी मिळाली ती प्रामाणिक पार पाडायची ही पक्षाची आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि तिच मी आयुष्यभर पार पाडेन. मी तिच कायम पाळणार, असेही अनिल (Anil Parab Shivsena Minister List) परब म्हणाले.”

“मी विद्यार्थी आहे. त्यामुळे जी जबाबदारी मिळेल त्यात अभ्यास करुन अतिशय चांगल्या पद्धतीने रिझर्ल्ट देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार, असेही अनिल परब म्हणाले.”

“मंत्रिपदी माझ्याशिवाय अजून कोणाची वर्णी लागली आहे हे मला माहित नाही. त्यामुळे त्याबाबत भाष्य करणार नाही, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.”